अजित पवार यांचं पुढचं पाऊल, जयंत पाटलांचीही हकालपट्टी, प्रफुलभाईंनी पवारांनाच कायदा शिकवला

0

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर अजित पवार यांनी पुढचं पाऊल टाकलंय. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. आजच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा हँडओव्हर तटकरे यांना द्यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांची गटनेतेपदी निवड केली असून अनिल भाईदास पाटील हे प्रतोद असतील, असंही प्रफुल पटेल यांनी सांगितलंय. दुसरीकडे कुणावरही अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे होऊ शकत नाही. विधानसभेच्या अध्यक्षांकडे हेह प्रकरण जातं. त्याची लांबलचक प्रोसेस असते, असं सांगायला देखील प्रफुल पटेल विसरले नाहीत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अजित पवार आणि त्यांना साथ दिलेला आमदारांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस राष्ट्रवादीने पाठवल्यानंतर अजित पवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला स्वतः अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केलं. या पत्रकार परिषदेतून शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इशारा देताना कुठल्याही नेत्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही किंवा कुठल्याही नियुक्त्या तुम्ही करू शकत नाही, आम्ही म्हणजेच पक्ष आहोत हे देखील अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.
बहुसंख्या आमदार माझ्यासोबत आहेत म्हणूनच मी उपमुख्यमंत्री झालो आहे. माझ्या निर्णयाला राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. पक्ष चिन्ह आणि पक्षनाव याच्यावर वाद न घालण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु आमच्या आमदारांना कोणी घाबरवू नये. रात्री १२ वाजता प्रेस घेऊन काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय, असं अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना उद्देशून वक्तव्य केलं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता