दिल्लीत रात्रीस खेळ चाले; शिंदे फडणवीस २ वाजता मुंबईत दाखल सरकारमध्ये मोठे फेरबदल?

0

आगामी लोकसभा व त्या पाठोपाठ होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युतीसरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्रापाठोपाठ राज्याचाही मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दरम्यान, अकार्यक्षम मंत्र्यांसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला दौऱ्यावर गेले होते. तिथे अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहेत.

मात्र, दोघेही रात्रीच म्हणजेच २ च्या सुमारास मुंबई परतले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्या जागी नवीन चेहरे देण्यावर युती सरकारचा भर देणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील भाजपच्या महाराष्ट्रातील २ अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

यात एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पद असून त्या जागी कोणाची वर्णी लावायची हा निर्णय शिंदेंवर सोडलेला असल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्रात मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी लाॅबिग करण्यास सुरूवात केल्याचे कळते. मात्र निवडणुकांच्या तोडांवर सरकारची इमेज बदलण्यासाठी तरुण-तडफदार नेत्यांना केंद्रात व राज्यात संधी देण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे.