मध्य प्रदेशाला कमळ फुलणार की काँग्रेसचं सरकार! निष्कर्ष चक्रावणारे या शर्यतीत आघाडीवर?

0
1

मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनीदेखील तयारी सुरू केली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून सरकार स्थापन दावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ या दोन्ही नेत्यांनी राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला असून निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. लोकांचा कल सध्या काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने सर्वे केला आहे. या सर्वेतून काही रोचक तथ्य समोर आली आहेत.

मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मध्य प्रदेशच्या ओपनियन पोलमध्ये जवळपास 17 हजार लोकांची मते जाणून घेतली. काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी किती जागा मिळतील, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला मिळालेले उत्तर हैराण करणारे आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप की काँग्रेस? कोणाचे सरकार स्थापन होणार, याबाबत मध्य प्रदेशमधील जनतेने आपले मत सर्वेक्षणात नोंदवले आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

मध्य प्रदेशात मतांची टक्केवारी
भाजप-44%
काँग्रेस-44%
बसपा-2%
इतर – 10%

मध्य प्रदेशात एकूण जागा – 230
भाजपा-106-118
काँग्रेस- 108-120
बसपा-0-4
इतर-0-4

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर कोण?
सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या 57 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पहिली पंसती दर्शवली. तर, 18 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली. तर, 3 टक्के लोकांनी आपचे राष्ट्रीय संजयोक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली. 14 टक्के लोकांना अन्य उमेदवारांना पसंती दर्शवली.