आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत असून महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष मविआमध्ये आपली शक्ती वाढविण्यासाठी बैठकीचे सत्र सुरू केले आहे. राज्यात काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रात सर्व्हे करून 21 जागांवर सकारात्मक वातावरण असल्याचा वृत काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजून वेळ आहे.
पण आतापासूनच सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. कर्नाटकमध्ये विजयानंतर काँग्रेसकडून महाराष्ट्रात आतापासूनच जोरबैठक सुरू झाल्या आहे. महाराष्ट्रात नंबर 3 वर असलेला काँग्रेस पक्ष नंबर वनचा दावा करत आहे. 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वे करून 21 जागांवर सकारात्मक वातावरण काँग्रेस पक्षाला दिसले आहे.
निरीक्षणामध्ये काँग्रेस पक्षाला फायदा झाला असून महाविकास आघाडीत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्षाकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणूकसाठी महाविकास आघाडीत बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्नही केला जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसाठी बैठकीचे सत्र सुरू केले आहे.
(अजित पवारांचा कट्टर समर्थक एकनाथ शिंदेंच्या गळाला?
मुख्यमंत्र्यांनी घेतली अण्णा बनसोडेंची भेट)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन बैठका घेऊन किती जागा मविआकडे मागायच्या यांची रणनिती कोर ग्रुपच्या बैठकीत आखली जात आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 26 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 22 जागा लढल्या होत्या. मात्र निवडणुकीत काँग्रेस पक्ष एकच जागा जिंकू शकली. (
अजितदादांची सर्व लवाजमा सोडून छुपी भेट; ‘तो’ कारखाना पुन्हा चर्चेत; भाजप म्हणाले.
.) 2019 च्या निवडणूकीत दोन सहकारी आघाडीत होते.
तर 2024 साठी महाविकास आघाडी असून तीन हिस्सेदार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या जुन्या जिंकलेल्या जागा सोडून इतर जागेवर वाटाघाटी करा अशी मागणी केली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी याला विरोध करुन 16,16,16 चा फॉर्म्युला दिला. मात्र एक जागेवर निवडून येणाऱ्या पक्षाला 16 जागा देणार नाही असा विरोध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केला होता. आता काँग्रेसकडून मिरीट आधारावर जागावाटप होईल अशी भूमिका घेतल्यानंतर दोनही मित्र पक्षाचा सूर मावळला आहे. मविआची जागा वाटपाचे सूत्र अजून ठरले नाही मात्र काँग्रेस आपला बार्गेनिंग पॉवर वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.