बिपरजॉय च्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून 67 ट्रेन रद्द; बिपरजॉय चक्रीवादळ उग्र होण्याचा धोका

0
1

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पाश्वभूमीवर पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या ट्रेन्स रद्द केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. बिपरजॉय वादळ सध्या घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर काम करत आहे. आज सायंकाळी मुंबईतल्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर पाच तरुण बुडाल्याची घटना घडली आहे.

चक्रीवादळाच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या ६७ लोकल रद्द केल्या आहेत. उद्यापासूसन १५ जूनपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ उग्र रुप धारण करण्याचा धोका संभवत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या आसपास हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसू शकतो

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला