मोबिन मतीसे यांची भाजपच्या जिल्हा सहसंयोजक पदी निवड

0
1

भिगवण येथील मोबिन इसाकमिया मतीसे यांची भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या पुणे जिल्हा ग्रामीण सहसंयोजक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.मतीसे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून पक्षवाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. पदाच्या माध्यमातून जनतेच्या प्रगती कल्याणासाठी व शासनाच्या विविध योजना शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी

प्रयत्नशील राहावे व पक्षसंघटन मजबूत करावे अशी अपेक्षा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केली. महाराष्ट्र भाजपचे महामंत्री विजय चौधरी भाजपचे ग्रामविकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांच्या हस्ते मतीसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. मोबिन मतीसे यांनी त्याचे आभार व्यक्त केले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा