ओडिसातील बालासोर २८८ मृत्यू ११०० जखमी; जबाबदार लोकांचीही ओळख पटली: रेल्वेमंत्री

0

ओडिसातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा बळी गेला. तर ११०० हून अधिक जण जखमी झालेत. दरम्यान आता या अपघाताचे कारण समोर आले आहे. आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सलग दुसऱ्या दिवशी बालासोर रेल्वे अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताचे कारणही सांगितले आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. तसेच याला जबाबदार असलेल्या लोकांचीही ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांनी हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला.

पंतप्रधान मोजींनी दिलेल्या सूचनांनूसार काम वेगाने सुरू आहे. काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व डब्बे काढण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत सामान्य मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेमंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही अपघातस्थळी दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी उपस्थित आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २८८ झाली आहे. ११७५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी ७९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३८२ जणांवर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि इतर जखमींना ५०,००० रुपये मदत जाहीर केली आहे.

या अपघाताच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकापूर्वी, ते मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनवर गेले होते, जिथे ते आधीच थांबलेल्या मालगाडीला धडकली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्सप्रेससाठी अप मेनलाइन सिग्नल देण्यात आला होता आणि नंतर तो काढून टाकण्यात आला होता. यामुळे गाडी लूप लाइनमध्ये घुसली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मालगाडीला धडकल्यानंतर त्याचे काही डबे रुळावरून घसरले. दरम्यान, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मेन लाइनवरून गेली आणि रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्याला धडकल्याने तिचे दोन डबे उलटले.

ट्रेन 128 किमी वेगाने धावत होती

128 किमी प्रतितास वेगाने धावणारी कोरोमंडल एक्सप्रेसबंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस ११६ किमी प्रतितास वेगाने धावत होती.

२,५०० हून अधिक प्रवासी

या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये २,५०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर, अडकलेल्या १,५०० प्रवाशांना विशेष गाड्यांद्वारे त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यात येत आहे. शनिवारी १,००० प्रवाशांना हावडा येथे नेण्यात आले. २०० प्रवाशांना बालासोरहून हावडा येथे दुसऱ्या ट्रेनने आणले जात आहे. भद्रकहून चेन्नईला जाणाऱ्या स्पेशल ट्रेनमधून २५० प्रवासी पाठवण्यात आले. यातील १३३ प्रवासी चेन्नईत, ४१ विशाखापट्टणममध्ये आणि उर्वरित इतर शहरांमध्ये उतरतील.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

२०० रुग्णवाहिका, दोन हवाई दल हेलिकॉप्टर तैनात

अपघातस्थळी ५० बस आणि ४५ मोबाईल हेल्थ युनिट कार्यरत होते. गंभीर जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी IAF ने डॉक्टरांच्या टीमसोबत दोन Mi-I हेलिकॉप्टर तैनात केले होते.