संजय राऊत आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यामुळे पुन्हा त्या वादग्रस्त प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. काही दिवसापूर्वी संदल मिरवणुकीत काही तरुण मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्याने वाद झाला होता.या मिरवणुकीत धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याला आवाहन देत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.






अशी कुठलीही धूप दाखवण्याची परंपरा नाही. संजय राऊत यांनी ते सिद्ध करून दाखवावं, असं म्हणत नितेश राणे आणि आचार्य तुषार भोसले यांनी आव्हान दिलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.कोणीतरी पोर येतात आणि हिंदुत्व बद्दल बोलतात. धूप दाखवल्यामुळे हिंदुत्व धोक्यात येत नाही. इतका हिंदुत्व धर्म कमजोर नाही. धर्मात तेढ निर्माण करून आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालून निवडणुका जिंकता येत नाहीत. हे आता त्यांना कळून चुकलं आहे. ज्यांनी गोमूत्र शिंपडले ते मूर्ख लोक आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.










