उत्तराखंडमधील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांमागे ‘या’ गोष्टींचा संबंध !

0
1
डेहराडून (उत्तराखंड) – येथील पछुवा डेहराडून भाग हा ‘लव्ह जिहाद’चा अड्डा बनत असल्याचे समोर येत आहे. हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर आणि विवाह करण्यास भाग पाडले जात आहे. हिंदु संघटनांच्या माहितीनुसार अल्पवयीन हिंदु मुलींना येथील उपाहारगृहांमध्ये आणले जाते. येथील खोल्यांमध्ये त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. त्यांचे अश्‍लील व्हिडिओ बनवले जातात. नंतर त्या आधारे या मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना धर्मांतर आणि विवाह करण्यास भाग पाडले जाते.

गेल्या २ आठवड्यांमध्ये पछुवा डेहराडून येथे लव्ह जिहादची ८ ते १० प्रकरणे समोर आलीआहेत. ताज्या घटनेमध्ये सौंदर्य प्रसाधनाविषयीचे (ब्युटी पार्लरचे) काम करणार्‍या हिंदु तरुणीला फरहान याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी लैंगिक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ बनवला. त्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत होता. या तरुणीचे अन्य तरुणाशी विवाह झाल्यानंतरही फरहान तिला ब्लॅकमेल करून हॉटेलमध्ये बोलवत होता. याची माहिती ‘वैदिक मिशन’ या संघटनेला मिळाल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी फरहान याला अटक केली. फरहान याला साहाय्य करणारा त्याचा भाऊ नईम सलमानी यालाही अटक करण्यात आली आहे. पछुवा डेहराडून येथील लव्ह जिहादच्या ३ घटनांतील आरोपी पूर्वी केरळमध्ये जाऊन आले होते. यावरून ‘उत्तराखंडमधील मुसलमान तरुणांना केरळमध्ये लव्ह जिहादचे प्रशिक्षण दिले जाते का ?’ याचा आता पोलीस शोध घेत आहेत. यासह ‘या भागात लव्ह जिहादचे षड्यंत्र रचले गेले आहे का ?’ याचाही शोध घेतला जात आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

कठोर कारवाई करा ! – मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पोलिसांना आदेश उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंर्तगत अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला आहे. ‘देवभूमी उत्तराखंडला लव्ह जिहादचा अड्डा बनू दिला जाणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.