त्यांचा हा गुण अनेकांना आकर्षित करतो. – लग्नानंतर स्त्रिया त्यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसावं, यावर अधिक लक्ष देतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक रुटीन फॉलो करतात, ज्यामुळे त्या पूर्वीपेक्षा चांगल्या दिसतात. – बहुतेक महिला लग्नानंतर स्ट्रेट फॉरवर्ड होतात.स्पष्ट बोलण्यावर त्यांचा विश्वास असतो. एखाद्या सोबत संवाद साधताना त्या कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करत नाहीत. – लग्नानंतर, मुलींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्या केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींचीदेखील खूप काळजी घेतात.अनेक मुलांना हा काळजी घेण्याचा स्वभाव आवडतो. – विवाहित महिलांचा ड्रेसिंग सेन्स अविवाहित मुलींपेक्षा चांगला असतो, जो अनेक तरुण मुलांना आवडतो, व ते हळूहळू संबंधित महिलेकडे आकर्षित होऊ लागतात. – लग्नानंतर अनेक स्त्रियांची मॅच्युरिटी लेव्हल वाढते, जी अनेकदा अविवाहित आणि तरुण मुलींमध्ये दिसून येत नाही. तसंच विवाहित महिलांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा मुलांना आवडतो.अर्थात भारतीय संस्कृतीत विवाहित महिलेच्या प्रेमात पडणं किंवा तिच्याशी नातं ठेवणं, अयोग्य आहे. जर एखाद्या अविवाहित तरुणाने विवाहित महिलेला डेट करण्याचा प्रयत्न केला, तर तो एकप्रकारे स्वत:साठीच संकट निर्माण करत असतो. त्यामुळे प्रेम, रिलेशनशिप बाबतीत विवाहित मुलींपासून दूर राहणंच योग्य आहे. कारण प्रेम कुणावरही होऊ शकतं, हे जरी खरं असलं तरी प्रेमात पडताना ते प्रेम भविष्यात संकट निर्माण करणार नाही ना, याचीही काळजी घेणं गरजेचं आहे.
अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात? कारण जाणून व्हाल थक्क
नवी दिल्ली, 02 जून : प्रेम कुणावरही होऊ शकतं यात शंका नाही. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला ना समाज दिसतो, ना वय दिसतं. अनेकदा एकमेकांबद्दलचं आकर्षण प्रेमात महत्त्वाचं कारण ठरतं.आता तुम्हाला ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण सिंगल अर्थात अविवाहित असलेल्या तरुणाला सिंगल असणाऱ्या तरुणीऐवजी लग्न झालेली स्त्री जास्त आवडते, अशा स्त्रियांबद्दल त्याला जास्त आकर्षण असतं. यामागची अनेक कारणं आहेत, जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘झी न्यूज हिंदी’ ने याबाबत वृत्त दिलंय. अविवाहित तरुणी-तरुणींमध्ये प्रेमाचा धागा निर्माण होणं, खूप सामान्य गोष्ट आहे.
परंतु तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, अविवाहित तरुणाचं क्रश हे अनेकदा विवाहित महिला असतात. विशेष म्हणजे संबंधित महिलेचं लग्न झालं असल्याचंसुद्धा त्यांना माहिती असतं; पण अविवाहित तरुणांना विवाहित महिलांचं आकर्षण वाटण्याची विविध कारणं आहेत. ती कारणं नेमकी कोणती, याबाबत जाणून घेऊ. – विवाहित स्त्रिया अविवाहित मुलींपेक्षा अधिक आत्मविश्वासपूर्ण असतात, व ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत असतं.