मी असभ्य लोकांशी बोलत नाही…-सुषमा अंधारे

0
1

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रकरणात त्या आमदाराने क्लिनचीट दिली असल्याचं सांगितलंय. मी असभ्य लोकांशी बोलत नाही. पण देवेंद्रजी, तुम्ही एक अभ्यासू आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलतेय. ही क्लिनचीट कशी दिली गेली. याबाबत खुलासा करावा असंही अंधारे म्हणाल्या.दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या निकाल जाहीर होणार संजय शिरसाट काय म्हणाले होते ?

सुषमा अंधारे तपास समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्या पत्रकार परिषदेत रडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्या चांगल्या अॅक्टर आहेत. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हा अहवाल कोर्टात जाईल, तेव्हा त्यांनी बाजू मांडावी असं शिरसाट म्हणाले होते. तसेच मी वारंवार सांगितलं होतं, मी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नव्हतं. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. आता तरी त्यांनी समजावं अशी प्रतिक्रिया शिरसाटांनी दिली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय