सोलापूरच्या राजकारणात खळबळ! प्रणिती शिंदेंचे विरोधक जयंत पाटलांच्या भेटीला

0

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरात दाखल होताच त्यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पाटील हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. वाढदिवस आणि आत्मचरित्र पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.जयंत पाटील आणि आडम मास्तर यांच्या या भेटीने सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आडम हे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे आडम-पाटील भेटीने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.माजी आमदार नसय्या आडम यांचा आज वाढदिवस आहे. तसेच, त्याच्या आत्मचरित्राचे आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव खासदार सीताराम येचुरी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने येचुरी हे सोलापुरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका लग्नासाठी सोलापुरात आले आहेत. लग्नसोहळा संध्याकाळी असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

जयंत पाटील यांनी सोलापुरात दाखल होताच महेश कोठे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी कोठे, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले सुधीर खरटमल यांच्याशी चर्चा केली. सोलापुरातील राष्ट्रवादीबाबत त्यांच्यात या वेळी झाली. सोलापूर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार की मित्रपक्ष असलेले काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी जागा सोडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.कोठे यांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी माजी आमदार आडम यांचे घर गाठले. त्या ठिकाणी जात आडम मास्तर यांना जयंत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, पुस्तक प्रकाशन सोहळ्यालाही सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या भेटीने सोलापूरच्या राजकारणाम मात्र खळबळ उडाली आहे. या वेळी जयंत पाटील यांच्यासोबत माजी महापौर महेश कोठे, माजी आमदार दीपक साळुंखे हे उपस्थित होते.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम यांचा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी २००९ मध्ये पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही पराभव केला. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या आडम यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.