स्वत:ला IAS व PMO मध्ये पोस्टिंग सांगणाऱ्या तोतयाला अटक

0
1

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) नियुक्त भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी म्हणून भासविणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला औंध येथील एका चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ५४ वर्षीय तोतयागिरी करणाऱ्याला पोलिसांनी पकडले आहे.

इंडीयन एक्सप्रेस ने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव वासुदेव निवारुत्ती तायडे (५४ वर्ष) असे असून तो स्वत:ची ओळख डॉ. विनय देव अशी सांगत होता. तसेच पीएमओ कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत असल्याचे तो सांगत होता. अनेक गुप्तचर कामात गुंतला असल्याचा दावा त्यानी केला आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेने सोमवारी औंध परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिथे एका धर्मादाय उपक्रमाचा भाग म्हणून एक रुग्णवाहिका जम्मू-काश्मीरला पाठवली जाणार होती. यावेळी वासुदेव निवारुत्ती तायडे यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि त्याने दावा केला की तो आयएएस अधिकारी आहे. तसेच पीएमओ कार्यालयात कार्यरत आहेत.

संस्थेच्या विश्वस्तांना त्याची कृती आणि दावे संशयास्पद वाटले आणि त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. तपास सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने त्या व्यक्तीचा शोध घेऊन चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. तळेगाव दाभाडे येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे