नव्या संसद भवनाच्या उभारणीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा! नागपूरहून गेलं सागवान, तर…

0
1

देशाच्या संसद इमारतीचे उद्या औपचारिक उद्घाटन केले जाणार आहे. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. या नव्या इमारतीमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधीत्व पाहायला मिळते. या इमारतीसाठी आवश्यक असलेलं साहित्य त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर अनेक ठिकाणांहून मागवण्यात आलं आहे.
मिर्झापूर येथून आले गालीचे

नव्या संसद भवन इमारतीसाठी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून गालीचे (कालीन) मागवण्यात आले आहेत. मिर्झापूर हे शहर गालीचे म्हणजेच कालीनसाठी प्रसिद्ध आहे. मिर्झापूर या वेब सीरीजने याला जास्त फेमस केलं आहे. या सीरीजमधील कालीन भैय्या हे पात्र खूप गाजलं आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी साकारलेलं कालीन भैय्या हे पात्र गालीच्यांचा व्यापारी दाखवण्यात आलं आहे. आता त्याच शहरतील गालीचे संसद भवनामध्ये लावण्यात येणार आहेत.
नव्या संसद भवनामध्ये उत्तर प्रदेशाती मिर्झापूर येथील गालीचे यासोबतच, त्रिपुरातील बांबूपासून बनलेला फ्लोअर आणि राजस्थानात तयार झालेली दगडाची नक्काशी लावण्यात येणार आहे. नव्या संसदेत लावलं जाणार सागवान लाकूड महाराष्ट्रातील नागपूर येथून नेण्यात आलं आहे. तर लाल आणि पांढरे वाळूचे खडक राजस्थान येथील रसमथुरा येथील आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला आणि हुमायूंच्या मकबऱ्यासाठी देखील हा खडक सरमखुरा येथूनच आणण्यात आला होता, केशरी हिरवा खडक उदयपूर येथून अजमेरजवळच्या लाखा येथून तर लाल ग्रेनाइट आणि पाढंरा संगमरवर अंबाजी राजस्थान येथून मागवण्यात आला आहे.

लोकसभा आणि राज्यसभा सभागृहातील फाल्स सीलिंग साठी लागणारी स्टीलची फ्रेम हा केंद्र शासित प्रदेश दमन आणि दीव येथून मागवण्यात आली. तर संसदेतील फर्नीचर हे मुंबई येथे तयार करण्यात आलं आहे. इमारतीवर लावण्यात आलेली दगडी जाळी राजस्थानच्या राजनगर आणि उत्तर प्रदेशातील नोयडा येथून मागवली आहे. तर अशोक चिन्हासाठी आवश्यक सामग्री महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून मागवली आहे. संसद भवनाच्या बाहेरील बाजूस लावण्यात आलेलली सामग्री मध्ये प्रदेशच्या इंदौर येथून आणण्यात आली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

दगडांचे नक्षीकाम हे आबू रोड आणि उदयपूरच्या मूर्तीकारांनी केलं आहे. तसेच यासाठीचे दगड हे कोटपूतली, राजस्थान येथून आणण्यात आले होते. बांधकामासाठी रेती ही हरियाणा येथील चरखी दादरी येथे तयार झालेली एम सँड वापरण्यात आली आहे. हा एक कृत्रिम वाळूचा प्रकार आहे. ही वाळू ग्रेनाइटचा बारीक भूगा वापरून तयार केली जाते. तसचे फ्लाय अॅश विटा हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून मागवण्यात आल्या होत्या. या बांधकामात वापरलेलं पितळी सामग्रीसाठी आधीच तयार केलेले साचे हे गुजरातमधील अहमदाबाद येथून आणले होते.