गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विधानसभा जागांवरुन मविआमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच काल राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांची ईडीकडून ९ तास चौकशी झाली. तसेच आजपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा अनेक विविध मुद्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले.






पत्रकार परिषदेतील अजित पवार यांचे महत्त्वाचे मुद्दे
नोटा बदलण्यासाठी खुप जास्त वेळ दिला आहे. जनतेची गैरसोय होता कामा नये. वानखेडे संदर्भात नवाब मलिक जे बोलले ते खरं निघालं. मलिकांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. असा आरोप अजित पवार यांनी केला.
तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी होत नाही. सूडभावनेतून चौकशीला बोलवणं चुकीचं आहे. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. असं स्पष्टपणे सांगत अजित पवार यांनी जयंत पाटील नारज असलेल्या चर्चेला पुर्णविराम दिला.
मविआ एकजूट राहणार. एकजूट रहावी अशी आमजी भूमिका. मविआ कायम राहणार. मविआ मजबूत राहणार, स्टॅम्प पेपर द्या मी लिहून देतो. जागा वाटपासंदर्भात मविआमध्ये वेगवेगळी मत आहेत. पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात मुस्लिमांकडून छूप लावण्याची प्रथा जुनी आहे. धार्मिक तेढ निर्माण करु नका. मंदिराच्या मुद्यात राजकारण नको. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली. आशिष शेलार यांना मी ओळखतो. शेलार यांनी वादग्रस्त क्लिप दाखवणं चुकींच आहे. शेलार यांना मी चांगलचं ओळखतो.
कर्नाटक निवडणूकीमुळे भाजपला निवडणूकीची भिती वाटत आहे.
दंगली अटोक्यात येत नाही फडणवीसांनी लक्ष घालावं. गृहमंत्री हाताळण्यात अपयशी आहे. दंगली होणाऱ्या भागात राजकीय हस्तक्षेप करणं टाळा. फडणवीस यांनी पोलिसांना कारवाईसाठी मोकळीक द्यावी. १६-१६ फॉर्मुला ठरलेले नाही. जिंकलेल्या जागा सोडून उर्वरीत २५ जागांवर पहिल्यांचा चर्चा करणार. जिंकलेल्या जागा आमच्याकडे रहाव्या अशी ठाकरेंची इच्छा आहे. असं स्पष्टपणे अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.











