सिद्धरामय्यांच्या शपथविधीला दिग्गजांची हजेरी; राहुल गांधींचा हा नवीन ‘बंगळुरू पॅर्टन’ यशस्वी?

0
1

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा शपथविधी आज (ता.२०) झाला. या शपथ विधी सोहळ्यात विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बंगळुरुमध्ये हजेरी लावली. आता विरोधकांची ही एकी लोकसभा निवडणुकीत टिकणार का? हा खरा प्रश्न आहे. राहुल गाधींनी स्वागत केले तसेच प्रत्येकांचा हात हातात घेत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर राहुल गाधींचा हा बंगळुरु प्रयोग यशस्वी होईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

आजच्या या शपथविधीला काँग्रेसने नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. तर विरोधी पक्षांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्ट्रलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल काँन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचूरी, भाकपचे डी. राजा, मेहबुबा मुफ्ती, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, कमल हसन यांच्यासह २० पक्षांचे नेते उपस्थित होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी मात्र, बंगळुरूला जाण्याचे टाळले. काँग्रेस पक्षाने आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समिती व बहुजन समाज पक्षाला शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले नव्हते.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

मात्र, या वेळी उपस्थित असलेल्या नेत्यांना राहुल गांधी स्वत: भेटले. त्यांची त्यांचे स्वागत केले तसेच प्रत्येकांचा हात हातात घेत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर राहुल गाधींचा हा बंगळुरु प्रयोग यशस्वी होईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

बंगळुरूमधील शपथविधीला उपस्थित राहिलेल्या पक्षांमध्ये एकी झाली तरी त्याचा देशभरात वेगळा संदेश जाऊ शकतो. कर्नाटच्या विजायनंतर विरोधकांना बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजपसोर (BJP) एक मजबूत आघाडी निर्माण करण्याचा काँग्रेसह इतर पक्षांचाही प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी घेतलेला पुढाकार पुढील काळात यशस्वी होता का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे