दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा दबदबा कायम, १० व्या दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

0

अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला होता. अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवून त्यावर बंदीची मागणीही केली होती. मात्र हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. यासोबतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई करत आहे. पहिल्या वीकेंडमध्ये धमाकेदार कमाई केल्यानंतर ‘द केरळ स्टोरी’ने दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारी चित्रपटाचे कलेक्शन किती झाले ते येथे जाणून घेऊया.

‘द केरळ स्टोरी’ने 10 दिवशी केली किती कमाई?
‘द केरळ स्टोरी’ची सुरुवात चांगली झाली. यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जो वेग पकडला होता, तो आता आणखी वाढतच गेला. ‘द केरळ स्टोरी’च्या कलेक्शनमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचवेळी, चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्या रविवारी किंवा 10व्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आला आहे.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या 10व्या दिवसाच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे. यानुसार, ‘द केरळ स्टोरी’ने 10व्या दिवशी 23.75 कोटी रुपयांची कमाई झाली. यासह, ‘द केरळ स्टोरी’ची एकूण कमाई आता 136.74 कोटींवर गेली आहे.

वादात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ प्रेक्षकांना पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 9 दिवसांत 100 कोटींचा जादुई आकडाही पार केला आहे. यासह हा चित्रपट 2023 मधील चौथा १०० कोटींचा बिझनेस करणाक चित्रपट ठरला आहे. यापूर्वी पठाण, तू झुठी मैं मक्कर आणि किसी का भाई किसी की जान हे चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा ३ मुलींची कथा आहे. त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि धर्मबदल केला जातो. यानंतर त्यांना ISIS च्या हवाली केलं जातं. दरम्यान एक मुलगी निसटून भारतात येते आणि घडलेली सर्व घटना सांगते. त्या मुलीचं पात्र अभिनेत्री अदा शर्माने साकारलं आहे. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक होतंय.