माजी महापौर महाडेश्वर यांचं ह्दयविकाराने निधन, मुलगी लग्न वाढदिवस शुभेच्छासाठी गेली, पण…

0
2

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे, त्यानंतर दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल. 2017 ते 2019 या काळात विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई महापालिकेचे महापौर होते.

मागच्या आठवड्यात ते गावाला होते. तिथून विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबई येऊन चार दिवस झाले आहेत. काल रात्री त्यांना ज्यावेळी त्रास जाणवू लागला, त्यावेळी त्यांना तात्काळ व्हि एन देसाई या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी दिली आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

विश्वनाथ महाडेश्वर यांचे नातेवाईक परशुराम तानावडे यांनी सांगितले की, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यांची मुलगी रात्री लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली असता तिने वडील बेशुद्ध पडलेले पाहिले, त्यानंतर त्यांना व्हीएन देसाई रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

‘माझ्या विभागातील सहकारी, मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेषदायक आहे. अनेक वर्षे ते मुंबई महापालिकेत शिवसेनेचे अभ्यासू सदस्य म्हणून काम करीत होते. मुंबई महापालिकेची महापौर पदाची कारकीर्द त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना’ – अनिल परब

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे