राष्ट्रवादीतील सर्व फक्तं स्क्रिप्टेड वाटतंय? …आम्ही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया?; देवेंद्र फडणवीस

0
1

राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवड समितीने शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.यानंतर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकार देखील अंतर्गत आहे, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा शेवट होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या सगळ्या घडामोडी या स्क्रिप्टेड वाटतायत का? असा प्रश्न विचारला असात फडणवीस म्हणाले की, असं मी म्हटलं नाही, मी असं काही म्हणणार नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट होईल, अंतिम काय होतंय यावर प्रतिक्रिया देता येईल असेही फडणवीस म्हणाले आहेत.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय झालं? शरद पवार यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेली समितीने शरद पवारांना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. आजच्या बैठकीत अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव आज मांडला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.

प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. एक राजीनामा नामंजूर करण्याचा, तर शरद पवार पून्हा अध्यक्ष व्हावे, असा दुसरा प्रस्ताव मांडण्यात आला. निवड समितीने एकमताने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. आता शरद पवार काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार समितीची शिफारस मान्य करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. समितीची शिफारस शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे