उत्तर प्रदेशात २०२४ ची सेमीफायनल; भाजपचा प्लॅन ‘बी’ या चेहऱ्याचीही चाचपणी

0

नवी दिल्ली – २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप पूर्णपणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भरवशावर लढवत आहे.राज्यातील १७ महानगरपालिका जिंकण्यासाठी योगींना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे योगींवर भाजप नेतृत्वाला एवढा विश्वास आहे की, संपूर्ण पक्ष कर्नाटकमधील निवडणुकीत उतरला असताना लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशला पूर्णपणे योगींच्या भरवशावर सोडण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला असला तरी उत्तर प्रदेशात भाजपचा कोणीही राष्ट्रीय नेता प्रचारासाठी तेथे गेलेला नाही. याबाबत जाणून घेण्यासाठी भाजपच्या एका नेत्याला विचारले असता, त्यांनी सांगितले की, योगींना उत्तर प्रदेशातच नव्हे तर कर्नाटकमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वांत जास्त मागणी होत आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशबरोबरच कर्नाटकातही भाजपला जिंकून देण्याचे काम करीत आहेत.उत्तर प्रदेशात १७ महापालिका, १९९ नगरपालिका, ५४४ नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. गुरुवारी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असून व ११ मे रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. १३ मे रोजी कर्नाटकबरोबरच येथील निकाल येणार आहेत. २०२४च्या निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुका सेमीफायनल समजल्या जात आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वांत जास्त ८० जागा आहेत व दिल्लीत सत्तेवर कोण येणार, हे याच जागा निश्चित करणार आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

एवढ्या महत्त्वाच्या निवडणुका असतानाही यूपीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सूत्रे योगींनी एकहाती सांभाळली आहेत. भाजपचा कोणीही नेता अद्याप यूपीमध्ये गेलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत सर्व ज्येष्ठ नेते कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत.

ना कर्फ्यू ना दंगा, सब कुछ चंगा ही चंगा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही योगी आदित्यनाथ यांचा डंका वाजत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. अतीक अहमदसारक्या गँगस्टरचा खात्मा केल्यानंतर यूपीमध्ये ‘ना कर्फ्यू ना दंगा, सब कुछ चंगा ही चंगा’ हा नारा योगींनी दिला आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान ११ मे रोजी होत आहे व दुसऱ्या टप्प्यात भाजपचे काही ज्येष्ठ नेते यूपीमध्ये निवडणूक प्रचारासाठी जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा