अनेक नेते मुंबईत एकत्र, सर्वपक्षीय आमदार एकत्र येणार! जाणून घ्या…

0
2

मुंबई : सर्वपक्षीय आमदारांना एकाच मंचावर घेऊन येणाऱ्या नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत (एनएलसी भारत) या अनोख्या परिषदचे आयोजन १५,१६ आणि १७ जून २०२३ या कालावधीत मुंबईत होत आहे. भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधान मंडळांची क्षमता बांधणी करणे तसेच त्यांची कार्यात्मक आणि व्यवस्थापकीय कार्यपद्धत्ती सुधारणे आणि अंतर राज्यांना प्रोत्साहन देणे हे या पक्षनिरपेक्ष परिषदेचे उद्दिष्ट आहे. यात सह-शिक्षण, विधिमंडळ कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, विधायी संस्थांमधील माहितीची देवाण-घेवाण आणि सहकार्य आणि सहयोग याचा समावेश असेल.

याच अनुषंगाने ३ मे २०२३ रोजी प्रख्यात जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे व्हिजनिंग एक्सरसाईजचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक प्रख्यात आमदार जसे की श्रीमती सुमित्रा महाजन (माजी अध्यक्ष लोकसभा), शिवराज पाटील (माजी अध्यक्ष, लोकसभा), राहुल कराड (कार्यकारी अध्यक्ष, MIT-WPU), राहुल नार्वेकर- (अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा),  कुलदीप सिंग पठानिया (अध्यक्ष, हिमाचल प्रदेश विधानसभा), पद्मश्री अनिल गुप्ता (CSIR भटनागर, SRISTI, GIAN, आणि NIF , हनी बी नेटवर्कचे सहकारी संस्थापक), पी.डी.टी आचार्य- (माजी सचिव, लोकसभा), डॉ. मनिषा कायंदे (आमदार, शिवसेना महाराष्ट्र), अनंत सिंघानिया (अध्यक्ष, IMC),  श्रीकांत भारतीय (एमएलसी, भाजपा, महाराष्ट्), विक्रम काळे (एमएलसी, राष्ट्रवादी, लातूर, महाराष्ट्र), कपिल पाटील (एमएलसी महाराष्ट्र), श्री बाबाजानी दुर्राणी (एमएलसी, एनसीपी), पाथरी-सेलू मतदारसंघाचे माजी आमदार हे सर्व आगामी परिषदेवर विचारमंथन  करण्यासाठी उपस्थित होते.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

यावेळी आगामी परिषदेसाठी विविध विचार आणि कल्पना मांडल्या गेल्या . परस्पर शिक्षणासाठी आमदारांच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचे प्रदर्शन करणे आणि चर्चा घडवुन आणने हे या परिषदेचे प्राथमिक उदिष्ट आहे.

एनएलसी भारतच्या तीन दिवसीय परिषदेच्या कालावधीत, पॅरेलल पॅनल डिस्कशन होईल. यात सुमारे १० थीम्सवर सर्वसमावेशक चार्चां समाविष्ट असतील. जसे की आर्थिक वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, प्रशंसनीय आंतरराष्ट्रीय कायदेविषयक पद्धतींचे प्रदर्शन करणे, नोकरशहा आणि आमदारांना सामाजिक उन्नतीसाठी सहकार्य करण्यासाठीचे मार्ग शोधणे यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येईल. प्रत्येक अधिवेशनात ४० विविध आमदारांचा समावेश असेल, या परिषदेमध्ये विधीमंडळाचे अध्यक्ष, सभापती, विरोधी पक्षनेता किंवा संसदीय कामकाज मंत्री यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

राजकीय रणनीतींद्वारे मतदारसंघ विकास या चर्चेद्वारे या शिखर परिषदेची सुरुवात होईल, त्यानंतर काही प्रमुख कार्यक्रमांद्वारे शाश्वत विकासाला चालना देणे, असक्षम लोकसंख्येस कल्याणकारी योजनांद्वारे आधार देणे, प्रोत्साहन देण्यावर सत्रे होतील. आजच्या राजकारण्यां समोरील आव्हाने आणि संधींबद्दल सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडण्यासाठी काही विषय निवडले गेले आहेत, जसे की सामाजिक कल्याणसाठी सहयोग, आणि वर्क लाईफ बॅलन्स द्वारे वेळ आणि कार्यालयीन जीवनाचे व्यवस्थापन, सामाजिक कल्याणास चालना देण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नोकरशहा, आमदार आणि नागरी समाज यांच्यातील परिणामकारक सहकार्य सुलभ करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

सर्वोत्तम पद्धती आणि परस्पर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एनएलसी भारत हे व्यासपीठ प्रदान करत आहे. जेथे भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आमदार त्यांचे अनुभव आणि यशोगाथा मांडतील. हे प्लॅटफॉर्म आमदारांनी राबवलेल्या प्रभावी धोरणांवर प्रकाश टाकेल याचसोबत विविध प्रदेशांसमोरील अनोख्या आव्हानांवर कश्या प्रकारे मात केली गेली याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करतील. सर्वोत्कृष्ट पद्धती समायिक करणार्या या सत्रांद्वारे, उपस्थितांना समवयस्कांच्या अनुभवांमधून शिकण्याची, यशस्वी विकास मॉडेल्स स्वीकारण्याची, चांगले परिणाम साध्य करण्यासाठी, संबंधित क्षेत्रांमध्ये अनुकूल संधीबद्दल ज्ञान मिळेल. याव्यतिरिक्त, ही परिषद आमदारांच्या कर्तृत्वाची ओळख करून देईल आणि त्यांना चांगले प्रशासन आणि सामाजिक कल्याणासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करेल.