मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पण फक्त अजित पवार हेच शरद पवारांच्या निर्णयाच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं. याबाबत अजितदादांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पवारांच्या या निर्णयाचं महत्वाही समजावून सांगितलं.






“एक अशी वेळ अशी आली…” राऊतांनी बाळासाहेबांचा दाखला देत पवारांच्या निवृत्तीवर केलं भाष्य
अजित पवार म्हणाले, “तुम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत पण सोनिया गांधींकडं पाहून चालली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या आजच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल”
राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांची निवड ‘ही’ समिती करणार! कोण आहेत सदस्य जाणून घ्या
“शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत, हे कुणी येऱ्या गबाळ्यानं पण सांगायचं कारण नाही. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचं ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेलं आहे. चव्हाण प्रतिष्ठाण, सिल्व्हर ओकवरुन तुम्हाला साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल”
‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन; शरद पवारांच्या आत्मचरित्रातून अनेक खुलासे
“अल्पसंख्यकांनीही काळजी करण्याचं कारण नाही, कारण ते अध्यक्ष असून किंवा नसू हा आपला परिवार असाच पुढे चालू राहणार नाही. भावनिक होऊ नका. पवार साहेबांनी परवाच सांगितलं की भाकरी फिरवाची असते, असाच त्यांनी निर्णय घेतला आहे. मी काकींशी देखील बोललो आहे तर त्यांनी सांगितलं की अजित ते आपला निर्णय आजिबात मागे घेणार नाहीत. तुम्हाला मला त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही”
शरद पवारांच्या निवृत्तीला कार्यकर्त्यांचा विरोध! घोषणाबाजीनं दणाणून सोडलं सभागृह
“अध्यक्ष नवीन गोष्टी शिकत जाईल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणं, पक्षाच्या मिटिंगमध्ये सहभागी होईल. शेवटी कोणीही अध्यक्ष झालं, प्रदेशाध्यक्ष झालं तरी साहेबांच्या जीवावरच पक्ष चालणार आहे, यावर कोणीही भविष्यवाणी करण्याची गरज नाही,” असं सविस्तर भाष्य यावेळी शरद पवारांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांनी केलं.











