‘खोटे गुन्हे दाखल करुन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर.’, बारसू प्रकरणावरुन काँग्रेसचा सरकारला इशारा

0

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना शिंदे-फडणवीस सरकारने  हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे.प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे  दाखल करुन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा आम्ही सरकारला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे राज्यातील सरकार बारसू प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती करत आहे. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. आजही पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर केला. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय बारसू रिफायनरी प्रकल्पाचा निर्णय सरकारने घेऊ नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. सरकार जर पोलिसांच्या बळावर प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणार असेल तर ते खपवून घेणार नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सरकार चर्चेपासून पळ काढत आहे सरकारने काही लोकांच्या हितासाठी व दिल्लीच्या दबावाखाली निर्णय घेण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही बारसू येथे जाऊन तिथल्या लोकांची मतं जाणून घेतली आहेत. तसेच समर्थक विरोधक, सर्व बाजूच्या लोकांशी सुद्धा चर्चा करुन त्यांची मतं घेतली आहेत. सरकार स्थानिकांशी, प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांशी चर्चा का करत नाही? चर्चेपासून सरकार पळ का काढत आहे? असा प्रश्नही त्यांनी शिंदे सरकारला विचारला. तसेच सरकारने सामंजस्याची भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढावा. आंदोलकांना संयमाने हाताळावं, दुर्दैवाने काही अघटित घडले तर सरकारला माहागात पडेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा