खासदार सुप्रिया सुळे यांनी डिवचलं अन् अजितदादांची मंत्र्यांनाही तंबी; म्हणाले, “पक्षाच्या कार्यालयातून काम झालं नाही म्हणून १ही व्यक्ती…”

0
1

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ॲक्टिव मोडमध्ये असल्याचं वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना डिवचलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मॅरेथॉन बैठका घेतल्या. शिवाय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देखील ॲक्टिव्ह मोडमध्ये येण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर होते.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील विकास कामांबाबत मॅरेथॉन बैठका घेतल्यानंतर राज्यातील लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकून मोठं बहुमत दिलं आहे. त्यामुळे झपाटून कामाला लागणं आमची जबाबदारी असल्याचे सांगितलं होतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्र्यांसाठी एक पत्रक काढलं आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

या पत्रकामध्ये सर्वसामान्य जनतेशी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जेष्ठ नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी विविध खात्याचे मंत्री पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

पक्ष कार्यालयाला एका दिवशी तीन वेळेत तीन मंत्री हजेरी लावणार आहेत. या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अजित पवारांनी मंत्र्यांना लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम संभाळून पक्षाच्या कार्यालयात हजर रहा. काम झालं नाही म्हणून पक्षाच्या कार्यालयातून व्यक्ती जाता कामा नये अशी सूचना दिली आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

असे असेल वेळापत्रक

07 जानेवारी 2025 पासून भेटीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

मंगळवार

वेळ स. 10.00 ते दु. 12.00 – हसन मुश्रीफ

वेळ स. 12.00 ते दु. 2.00 – धनंजय मुंडे

वेळ दु. 2.00 ते 4.00 – दत्तात्रय भरणे

वेळ दु. 4.00 ते 6.00 – मकरंद पाटील

बुधवार

वेळ स. 10.00 ते दु. 12.00 – हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील

वेळ स. 12.00 ते दु. 2.00 – माणिकराव कोकाटे

वेळ दु. 2.00 ते 4.00 – नरहरी झिरवाळ

सायं. 6.00 ते. 8.00 – आदिती तटकरे

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

गुरुवार

वेळ स.10.00 ते दु. 12.00 – हसन मुश्रीफ

वेळ स. 12.00 ते दु. 2.00 – इंद्रनील नाईक