समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान संलग्न शिवकल्याण रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन

0

कोथरूड येथील सुतारदरा या भागात शिवकल्याण रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन आज मोठ्या थाटामाटात करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व नगरसेवक माजी महापौर प्रशांतदादा जगताप, माजी उपमहापौर तथा नगरसेवक दीपकभाऊ मानकर, स्थानिक नगरसेवक चंदू शेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संतोषजी ढोक, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेशजी हांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सचिव श्री योगेशजी वराडे, सामाजिक व युवा कार्यकर्ते माननीय शिवभक्त शरदभाऊ मोहोळ, सामाजिक कार्यकर्ते सौ स्वातीताई शरद मोहोळ, सामाजिक कार्यकर्त्या नयना ताई सोनार, दत्ताभाऊ भगत, सामाजिक कार्यकर्ते कान्होजी साळुंखे, निवृत्त सैनिक सुरेश तोंडे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष आनंद उर्फ बंडूशेठ तांबे हे होते.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

प्रशांत दादा जगताप यांनी आपल्या भाषणात भविष्यकाळात रिक्षाचालकांच्या ज्या काही समस्या, अडचणी ,व्यावसायिक मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजित दादा पवार माननीय सुप्रियाताई सुळे व माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतील असे आश्वासन दिले.

दीपक मानकर यांनी आपल्या भाषणात रिक्षा चालक हे आपला व्यवसाय करत असताना फार मोठी सामाजिक जबाबदारी ही निभावत असतात 24 तास नागरिकांना सेवा देण्याचे महत्त्वाचे कार्य रिक्षा चालक बांधव करत असतात त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी पतसंस्थेची स्थापना करावी व त्या पतसंस्थेसाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी पूर्ण ताकदीनिशी करण्यासाठी तयार आहे असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक चंदूशेठ कदम यांनीसुद्धा रिक्षा चालकांच्या दैनंदिन जीवनातील व व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मदत करण्यास तयार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

कार्यक्रमाचे अध्यक्ष व समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडू शेठ तांबे यांनी कोरोना कालावधीत रिक्षाचालकांना केलेल्या अन्नधान्य वाटपाची सविस्तर माहिती यावेळी सांगितली, त्याचप्रमाणे ओला उबेर रॅपिडो यांच्या विरोधात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील लढाई जिंकल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली ,कोर्टाच्या माध्यमातून संघटनेने ओला उबेर रॅपिडो या बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या पुंजीपती कंपन्यांच्या वर बंदी घालण्यास यशस्वी झाले आता पुढील कालावधीत रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी भाडे नाकारू नये, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, प्रवासी हेच आपले दैवत असून त्यांच्या अडीअडचणीला सुद्धा धावून जावे व रिक्षा स्टॅन्ड हे नागरिकांच्या साठी एक मदत केंद्र असावे अशा भावना व्यक्त केल्या, उद्घाटन कार्यक्रमासाठी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष अमित कोंढाळकर उपाध्यक्ष राजेंद्र मारणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम आयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!