अजितदादाचा युवा आरोग्यदूत ‘विशेष दिनी’च रणांगणात; नव संकल्प भव्य दिव्य नियोजन जेष्ठ अन् तरुणही साथीला






सध्या शहरांमध्ये पुणे महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक जण विजयी संकल्पच्या उद्दिष्टाने वेगवेगळे आराखडे आखात असताना बावधन-भुसारी कॉलनी प्रभागांमध्ये आरोग्यदूत म्हणून नावारूपाला आलेल्या अजितदादांचा युवा शिलेदार कुणाला(आबा) वेडेपाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्त ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या आशीर्वादाने प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
प्रभागात नावारूपाला येण्यासाठी साड्या वाटप आणि लकी ड्रॉ असे वायफट कार्यक्रम घेण्यापेक्षा आरोग्यदूत म्हणून आपली ओळख निर्माण केली असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा हा युवा शिलेदार काळजीवाहू कार्यकर्ता म्हणूनच नागरिकांच्या सामोरे जात आहे. प्रभागातील नागरिकांची बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्याची काळजी ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली व्यक्तिगत जबाबदारी मानत राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला विधानसभेचे मा. अध्यक्ष कुणालआबा विलास वेडेपाटील यांच्या वतीने गेले तीन महिने आरोग्य धन मोफत उपक्रमांतर्गत विविध शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्याची काम केले जात आहे.
बावधन भुसारी कॉलनी प्रभागांमध्ये सध्या मित्रपक्ष असलेल्या विरोधकांच्या विचारसरणीचे सर्वच नगरसेवक असताना सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीमध्ये कोणताही बदल झाला नाही. विशिष्ट उद्दिष्टांनी फक्त वाटप आणि कार्यक्रम अशीच पाच वर्षाची वाटचाल चालू असताना अजित दादाचे युवा शिलेदार आणि मात्र या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले. गेली चार वर्ष छोट्या छोट्या स्वरूपात सुरू असलेली आरोग्यसेवा अविरत सुरू असतानाच सर्व नागरिकांना या उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी ‘आरोग्यधन’ स्तुत्य उपक्रम यशस्वी केला.
प्रभाग 10 मधील या सामाजिक बांधिलकीचे दर्शन असलेल्या उपक्रमाला प्रभागातील सुमारे ७ हजार २४६ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 27 नामांकित दवाखाने सहभागी झाले अन् अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सल्ला मिळाला.













