बारामती म्हटलं की अजितदादा आणि त्यांचेच कार्यकर्ते सर्व अलबेल! असं असतानाही मात्र सध्या अजित दादाच्या कार्यकर्त्याला विरोधी पक्षाकडून सराईत चंद्रकांत उत्तम कोकरे गुन्हेगाराच्या हस्ते जबर मारहाण झाली असून संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांचा मुलगा बारामती मध्ये उपचार घेत असून त्याच्या जीविता धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत उत्तम कोकरे हा या परिसरातील मोकाट आणि सराईत गुन्हेगार असून पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य कार्यवाही न करण्यात आल्याने मस्तेवाल गुन्हे करत आहे. मारहाणीच्या घटनेला 20 दिवसाचा कालावधी लोटला तरीही मुख्य आरोपी फरार असून पोलीस मात्र त्याचा मागोवा घेण्यापेक्षा सह आरोपीच्या जामीन्याला प्राधान्य देत असल्याने आजही संपूर्ण कुटुंब दहशतीमध्ये गुजराण करावी लागत आहे.






धुमाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भावजय सुजाता कोकरे पराभूत झाली त्यावेळेस सुद्धा चंद्रकांत उत्तम कोकरे, विकास उत्तम कोकरे, छगन काशिनाथ कोकरे, निलेष छगन कोकरे यांनी पुजा सचिन कोकरे व शौर्य सचिन कोकरे यांना मारहाण केली होती. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्यावेळी पुजा कोकरे व शौर्य कोकरे यांना दवाखान्यात नेऊन जिव वाचवल्याचा रागातून 15 दिवसांपूर्वी चंद्रकांत कोकरे याने मला जिवे मारण्याची धमकी दिली होती. आमच्या घराच्या बाजूने चंद्रकांत कोकरे हा चकरा मारताना दिसला होता. सांगवी- पणदरे रोडवरून जात असताना समि अक्षय दशरथ कोकरे (30 वर्षे) 17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता क-हावागज येथिल अंगणवाडीच्या कामावर जाताना हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सध्या अक्षयवर सहयाद्री हॉस्पिटल येथे औषध उपचार सुरू असून आरोपी जामीन घेण्याच्या तयारी आहेत.
घटनेबाबत सविस्तर माहिती….. चंद्रकांत उत्तम कोकरे, छगन काषिनाथ कोकरे, निलेष छगन कोकरे, सोमनाथ रमेश लोखंडे व इतर दोन अनोळखी इसम तोंडाला मास्क लावून हातामध्ये लोखंडी रॉड घेवून सांगवी- पणदरे रोडवर उभे होते. अक्षयची गाडी खाली पाडून सर्वांनी उचलून केळीच्या बागेत घेवून गेले. तेथे छगन कोकरे व निलेष कोकरे अक्षयचा गळा दाबु लागले, तेव्हा चंद्रकांत कोकरे त्यांना म्हणाला की, “याला इतका सहजासहजी मारायच नाही याचे हातपाय तोडून मग याचा मर्डर करू” असे म्हणाले. अक्षयला हातापायावर लोखंडी रॉडने मारहाण केली निलेश कोकरे याने पायाने माझे तोंड दाबले अक्षय ओरडत असताना निलेश कोकरे याने नाकावर फायटरने मारले. तेवढ्यात माझे भाऊ विनोद दषरथ कोकरे व संतोष नारायण कोकरे हे सोडविण्यासाठी पळत आले तेव्हा तोंडाला मास्क लावलेले दोन अनोळखी इसमांनी त्यांना पकडून ठेवले त्यांच्या समक्ष चंद्रकांत उत्तम कोकरे म्हणाला की, “तु आमच्या विरोधात इलेक्षन लढतो का? तुच सचिनच्या बायकोला व पोराला दवाखान्यात घेवून गेल होता म्हणून ते वाचले आज तुझा कार्यक्रम करतो.” असे म्हणून त्याने जोरात माझे डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला तेव्हा मी माझा डावा हाताने वार अडवला. पुन्हा डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याने अक्षय तडफडत करत बेशुध्द झाला. त्यानंतर विनोद दशरथ कोकरे व संतोश नारायण कोकरे यांनी अक्षयला सहयाद्री हॉस्पिटल, बारामती येथे अँडमिट केलेले असून औषध उपचार सुरू आहेत.
अक्षय दशरथ कोकरे याच्यावर संबंधित प्राणघात हल्ला हा पुर्ववैनमश्य, इलेक्शन, तसेच सरकारी कंत्राटी कामे मिळतात अशा प्रकारचा राग मनात धरून आयुष्य संपवण्याचा कट रचलेला होता. माळेगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं.२९४/२०२७ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८(२), ११८(१), १४० (१), १२६(२), १८९(२), १९०, १९१(१), १९१(२), १९९(३), १३७ अन्वये गुन्हा नोंदविलेला आहे. आरोपी क्र. २ व ३ यांना अटक केलेली आहे. आरोपी क्र.१ व ४ व इतर अनोळखी दोन इसम आजही मोकाट फिरत आहेत. आजपर्यंत पोलिसांनी अटक त्यांना केलेली नाही. याउलट सह आरोपी लोकांना जामीन करण्याची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित आरोपी जामीन वर सुटल्यानंतर फरार आरोपी संगणमताने पूर्ण कुटुंबावर ती हल्ला करण्याची भीती निर्माण झाली असून संपूर्ण कुटुंब दहशती खाली जगत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने योग्य कायदेशीर कारवाई मुख्य आरोपी यांना लवकरात लवकर अटक करून ‘मोका’ची कडक कारवाई करून त्यांचा जामिन मंजुर करू नये अशी मागणी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे अक्षय व कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे.













