स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून, महाराष्ट्रात क्षणाक्षणाला काही नवी राजकीय समीकरणं आकारास येत आहेत.अनुभवी नेत्यांपासून अगदी नवख्या तरुणाईचाही कल राजकीय वर्तुळाकडे दिसत आहे. अशा या वातावरणात महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती म्हणजे दोन अशा उमेदवारांची, जी जोडी त्यांच्यातील वयाच्या फरकासमवेत नात्यामुळंही चर्चेत आली आहे.






कोणत्या नगर परिषदेत सुरुय ही चर्चा?
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षांचे आजोबा आणि 21 वर्षांचा नातू एकाच वेळी रिंगणामध्ये उतरले आहेत. इथं नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणारे मारुती आबा बनकर हे भाजपचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर त्यांचा नातू हासुद्धा राज्यातील सर्वात तरुण नगरसेवक पदाचा उमेदवार ठरत आहे.
सांगोला नगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाकडून मारुती आबा बनकर या 73 वर्षांच्या आजोबांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. बनकर यांनी यापूर्वी दोन वेळा सांगोल्याचं नगराध्यक्ष पद भूषवलं आहे. त्यावेळी ते शेतकरी कामगार पक्षामधून नगराध्यक्ष झाले होते, आता मात्र ते ते भाजपच्या उमेदवारीवर निवडणुकीच्या लढतीत सहभागी होताना दिसत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सध्या कोणत्या निवडणुकीची सर्वाधिक चर्चा आहे?
सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीची. येथे 73 वर्षीय आजोबा मारुती आबा बनकर (नगराध्यक्ष पदासाठी) आणि त्यांचा 21 वर्षीय नातू ज्योतिरादित्य बनकर (नगरसेवक पदासाठी) एकाच वेळी रिंगणात उतरले आहेत.
मारुती आबा बनकर कोण?
वय: 73 वर्ष
पद: नगराध्यक्ष (सार्वजनिक उमेदवार)
पक्ष: भारतीय जनता पक्ष (BJP)
राजकीय पार्श्वभूमी: यापूर्वी दोन वेळा सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झालेले आहेत (दोन्ही वेळा शेतकरी कामगार पक्ष – शेकापमधून).
ज्योतिरादित्य बनकर कोण?
उत्तर: वय: फक्त 21 वर्ष
नातं: मारुती आबा बनकर यांचा नातू
पद: नगरसेवक (वॉर्ड सदस्य)
वैशिष्ट्य: राज्यातील सर्वात तरुण नगरसेवक उमेदवारांपैकी एक.
पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
बनकर यांना मिळालेली उमेदवारी आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे सर्वांचं लक्ष असतानाच यादरम्यान त्यांचा नातू ज्योतिरादित्य बनकर हासुद्धा वयाच्या 21व्या वर्षी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. नगरसेवक पदासाठी ज्योतिरादित्य यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या माहोलात आजोबा-नातवाच्या या जोडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.













