पुणे महापालिका प्रतीक्षा संपेल? आज अंतिम प्रभाग रचना प्रशासनाकडे प्राप्त? त्यानंतर लगेच ही प्रक्रिया सुरू होणार

संपूर्ण शहरात फक्त आठ-दहा ठिकाणी किरकोळ हद्दीचे बदल ६००० हरकती पण सुनावणीस फक्त ८२८ जण उपस्थित

0

पुणे महापालिका आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सुनावणी झाल्यानंतर त्यामध्ये १४ ते १५ बदल करण्यात आले असून, ६ ते ७ प्रभागांच्या नावांमध्ये बदल, तर ८ ते १० बदल हद्दींचे करण्यात आल्याची चर्चा आहे. ही अंतिम प्रभाग रचना पुढील दोन दिवसांत महापालिकेकडे जाहीर करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेच्या प्रतीक्षेत असलेल्यांची उत्सुकता लवकरच संपणार आहे, त्यानंतर लगेचच आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेने हा आराखडा नगरविकास विभागास सादर केल्यानंतर आणि नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर त्यामध्ये १४ ते १५ बदल केले गेले असून, प्रामुख्याने हद्दीचे बदल उपनगरांच्या प्रभागात केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे बदल खूप मोठे नसल्याचीही चर्चा आहे. प्रत्यक्षात प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच हे बदल समोर येणार आहेत. मुळात राजकीय प्रभावाने बनवण्यात आलेल्या या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक आयोगाकडून काही फेरबदल होण्याची अपेक्षा नसताना ही फक्त प्रक्रियाच आहे की निवडणूक आयोग नियमानुसार कठोर बदल करेल हे चित्र अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लक्षात येईल. पुणे महापालिकेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून चर्चेत न आलेली गोष्ट म्हणजे पुणे शहरातील महत्त्वाची अनुसूचित जाती आणि जमातीची आरक्षणाची हक्काचे ठिकाणे प्रचंड प्रमाणात बदलली असून त्यामुळे वाढत्या रोषाची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत हरकतींमध्ये सुद्धा रोज पाहण्यात मिळाला होता कदाचित प्रभाग रचनेत बदल न झाल्यास संबंधित संपूर्ण प्रक्रियेला न्यायालयात दाद मागण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

महापालिका निवडणूक यावेळी ४ सदस्यांच्या प्रभागानुसार होणार असून, १६५ नगरसेवक असणार आहेत. महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर वेळापत्रकानुसार, ४ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुमारे ६ हजार हरकती आल्या होत्या. या हरकतींवर १२ आणि १३ सप्टेंबरला सुनावणी घेण्यात आली. मात्र, सुनावणीसाठी प्रत्यक्षात ८२८ जणच उपस्थित राहिले. या सुनावणीत प्रामुख्याने नैसर्गिक हद्दी न पाळल्याने प्रभाग मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याचे आरोप करण्यात आले, तसेच या मोडतोडीमुळे अनेक प्रभागांचे आरक्षण बदलणार असल्याचा दावा करण्यात आला.

दोन दिवसांत प्रभाग रचना पालिकेकडे?

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेसाठी ३ ते ६ ऑक्टोबरमध्ये अंतिम आराखडा जाहीर करण्याची मुदत आहे. 2 ऑक्टो(दसरा व गांधी जयंती) ४ आणि ५ (शनिवार रविवार) अशा सुट्टी चा दिवस गृहीत धरता आज संध्याकाळपर्यंत हा आराखडा निवडणूक आयोगाकडून पुणे पालिकेस पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. २ ऑक्टोबरला दसरा, ३ ऑक्टोबरला शुक्रवार आणि त्यानंतर ३ऑक्टो शनिवार, ४ ऑक्टो रविवारमुळे शासकीय कार्यालये बंद आहेत. त्यामुळे महापालिकेस प्रभाग रचना मिळाल्यानंतरही जाहीर करताना त्यासोबत हद्दीची अधिसूचनाही जाहीर करावी लागणार आहे. आज(बुधवारी) अथवा शुक्रवारी महापालिकेस प्रभाग रचना मिळेल. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेत या सुनावणीनंतर काय बदल केले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार