राज ठाकरेंचे भारत-पाक सामन्यावर फटकारे, नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? शेअर केलं नवं व्यंगचित्र….

0

पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच एक नवं व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

व्यंगचित्रात काय म्हटलंय?

राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रात पहलगामधील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक दाखवण्यात आले आहेत. याबरोबरच गृहमंत्री अमित शहा तसेच आययीसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनाही दाखवण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात जय शहा ‘अरे बाबांनो उठा आपण जिंकलो पाकिस्तान हरले’ असं म्हणत आहेत. तर नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मनसेने नोंदवला होता निषेध

एप्रिल महिन्यात पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. यावेळी त्यांना धर्मविचारून मारण्यात आलं होतं. या हल्ल्यानंतर मनसेने तीव्र निषेध नोंदवला होता. यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला ‘एकदाच दणका द्या’ अशी मागणी केली होती. आता या व्यंगचित्राद्वारे त्यांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र शेअर केलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मात्र विरोधी पक्षांकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा