कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

0
1139

पुण्याचे पश्चिम द्वार म्हणजे कोथरूड आणि या कोथरूड भागातील गणेश विसर्जन एक कायमच आकर्षणाचा विषय राहिलेला आहे पुणे शहरामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये कर्वे रोड हा विसर्जनाचा मार्ग आकर्षणाचा बनत असतानाच या भागातील गणेश विसर्जन नियोजन व्यवस्थित व सुकर होण्याच्या हेतूने कोथरूड भागातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या व पत्रकारांच्या वतीने ‘कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती’ ची आपणा करण्यात आली असून यंदाच्या सतराव्या गणेश विसर्जन महोत्सवांच्या स्वागत कक्षाचे वासापूजन उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले.

भारतीय हिंदू संस्कृतीतील सण-उत्सव हे पक्ष विरहित असावेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आनंदाने उत्साहाने या उत्सवांमध्ये सहभागी व्हावे या निर्मळ निस्वार्थ उदात्त हेतूने या सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समितीची स्थापना करण्यात आली असून सर्वच पक्षातील कार्यकर्ते नेते आणि प्रशासकीय अधिकारी या सर्वांसाठी जिव्हाळ्याचा असणाऱ्या यंदाच्या 17 व्या गणेश विसर्जन महोत्सवाच्या वासापुजनाच्या निमित्ताने कोथरूड भागातील काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) या पक्षातील कार्यकर्त्यांसह गणेश भक्तही उपस्थित होते. यावेळी मारुती वर्वे, अमोल डांगे, वैभव जमदाडे, जयदीप पडवळ, उमेश कंधारे, राम बोरकर, मंदार जोशी, शिवाजी शेळके, अण्णा गोसावी, संदीप मोकाटे, संतोष लांडे, चेतन भालेकर यांच्या उपस्थितीत वासापूजन करण्यात आले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

राज्यभर सध्या महाराष्ट्र पुण्यातील मुख्य विसर्जन मार्गावरील विसर्जन मिरवणुकीचा वाद सुरू असताना कर्वे रस्त्यावर मात्र सर्वपक्षीय कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी यांनी एकत्र येत स्वागत कक्षाचे उद्घाटन केल्याने यंदा कर्वे रोड विसर्जन मार्गावरील मिरवणुका हे पुणेकरांची आकर्षण ठरल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी उपस्थित सर्व गणेश भक्तांनी व्यक्त केला.