‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

0
80

कोथरूड पुण्याची सांस्कृतिक राजधानी आणि पुण्याचे पश्चिमद्वार असलेल्या कोथरूडकारांच्या वतीने साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव हे कायमच आकर्षणाचे राहिले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संस्कृती प्रतिष्ठान गेली तीन-चार वर्षापासून पौराणिक देखावे करण्यामध्ये प्राधान्य देत असल्याने कोथरूड भागात या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची एक वेगळी चर्चा असते. विविध मान्यवर अन राजकीय पदाधिकारी यांची रेलचेल असल्यामुळे कोथरूड भागामध्ये संस्कृती प्रतिष्ठान आगळ वेगळं स्वरूप निर्माण झालेलं आहे. पुण्यनगरीतील गणेशोत्सव ज्याप्रमाणे एक वेगळ्या दर्जा वरती जाऊन नावारूपाला आला त्याप्रमाणेच पुण्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोथरूड नगरीमध्ये सुद्धा गणेश उत्सवाच्या निमित्ताने नवीन पायंडा सुरू झाला असून जिवंत देखावे सादर करणारा भाग म्हणून कोथरूडची नवी ओळख निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने गेली पाच वर्ष पौराणिक देखाव्यांना प्राधान्य दिले जात आहे. यंदा समस्त कोथरूड गावठाण मंडळाच्या वतीनेही प्रभू श्रीरामाच्या मंदिराची देखाव्या स्वरूपामध्ये आरस करण्यात आलेली आहे. तर संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वेरूळच्या लेणी हुबेहूब साकारण्यात आल्याने गणेश भक्तांमध्ये यंदाच्या उत्सवाच्या निमित्ताने वेगळाच उत्साह होता. सर्वसामान्य कोथरूडकरांसाठी यंदा मात्र संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ यांच्या वतीने उत्सव प्रमुख उमेश भेलके यांनी साकारलेला शिवपार्वती सोहळा जिवंत देखावा मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले असून सलग 10 दिवस या देखाव्याने सर्वोच्च गर्दी खेचण्याचा मान मिळवला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

कोथरूड भागामध्ये साकारण्यात आलेल्या देखाव्यांची छायाचित्रे – 

समस्त कोथरूड गावठाण यांच्यावतीने साकारण्यात आलेले प्रभू श्रीरामाचे मंदिर

पौड रस्त्यावरील मानाचे जयदीप मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेली विद्युत रोषणाई 

पौड रस्त्यावर आनंद नगर चौक केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वेरूळच्या लेणीचे हुबेहूब मंदिर

संगम मित्र मंडळ- शिवकालीन लढाईचा जिवंत देखावा 

स्वामी विवेकानंद मित्र मंडळ – मोबाईलचे दुष्परिणाम सामाजिक देखावा

गणराज तरुण मित्र मंडळ – होलिका राक्षसीन वध देखावा

मुठेश्वर मित्र मंडळ – कौटुंबिक नातेसंबंध जिवंत देखावा

शहीद मित्र मंडळ – अयोध्या नगरी प्रभू श्रीराम मंदिर विद्युत रोषणाई देखावा

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

संघर्ष मित्र मंडळ – महाराष्ट्राची लोककला हलता सामाजिक देखावा

अखिल भुसारी कॉलनी मित्र मंडळ – राजकीय पक्षांच्या चिन्हाचे शंभर तोटे सामाजिक देखावा

त्रिमूर्ती मित्र मंडळ – छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका जिवंत देखावा

संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ – शिवपार्वती विवाह सोहळा जिवंत देखावा