भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

0
2

महाराष्ट्र भाजपाची धुरा गेल्या अनेक दिवसांपासून कोणाच्या हाती दिली जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लगली होती. आता मात्र ही उत्सुकता संपली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

अन्य कोणीही अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध निवड

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राज्यात एक कायमस्वरुपी प्रदेशाध्यक्ष मिळावा, अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला.   रविंद्र चव्हाण यांच्याकडे अगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते. त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे एकमत भाजपात झाले. ठरल्याप्रमाणे त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

 राजकीय आणि सामाजिक वाटचाल

  • समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद म्हणजे मा. श्री. रविंद्र चव्हाण अर्थात रवि दादा। समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं… आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची व “न्यूज सायकल” मध्ये न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हाच रवि दादांचा नेहमीचा खाक्या आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार रविंद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हा रवि नावाचा दादा माणूस उदयाला आला.
  • गेल्या २५ वर्षांतील रविंद्र चव्हाण यांच्या प्रवासाचा हा मागोवा
  •  २००२ साली भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
  • २००५ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी
  • २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान
  • २००९ साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून दणदणीत विजय
  • २००९ नंतर २०१४, २०१९ आणि २०२४ असा डोंबिवलीच्या आमदारकीचा विजयी चौकार
  •  २०१६ साली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी; तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
  • २०१६ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार
  • २०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक
अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे