“स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२५” अन्वये कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया लि., स्वच्छ व जनवानी सहकारी संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ सहवास पुणे या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठी अंतर्गत दरवर्षीप्रमाणे ३१ मे २०२५ रोजी “जागतिक तंबाखू विरोधी निषेध दिन जनजागृती मोहीम प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले. सदर जनजागृती मोहीम डहाणूकर कॉलनी कोथरूड गावठाण, गणंजय सोसायटी, गुजरात कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, गाढवे कॉलनी, शास्त्रीनगर परिसर, आझाद वाडी, परमहंस नगर, सुतारदरा, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, शिवतीर्थ नगर, भुसारी कॉलनी इत्यादी परिसरामध्ये जनजागृती मोहीम राबवून पान, तंबाखू, गुटखा, खाणाऱ्या व विडी, ओढणाऱ्या नागरिकांना प्रत्येक पान विक्री करणाऱ्या दुकानावर जाऊन जनजागृती करण्यात आली.
सदर प्रचार फेरीमध्ये ” गुटखा, तंबाखू घ्या सोडून – जीवन करा आरोग्यपूर्ण..!, तंबाखूचा नाद मृत्यूला आमंत्रण…!, तरुणाईचा विनाश _ गुटखा सिगारेट यांचा सर्वनाश….!, तंबाखू मुक्त समाज हवा – चला करू एकत्रित दावा…!, पान, गुटखा, तंबाखू खाऊ नका स्वतःचे आरोग्य धोक्यात आणू नका…!, तंबाखू , गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थूंकू नका – आपले पुणे शहर घाण करू नका…! गुटखा, तंबाखूचे सेवन टाळा – व्यसनाला घाला आळा..! तसेच गुटखा व तंबाखू विरोधात शपथ देखील घेण्यात आली.
” मी आज या ठिकाणी, सर्वांच्या साक्षीने मनापासून शपथ घेतो की, कधीही गुटखा, तंबाखू,सिगारेट किंवा इतर कोणत्याही प्रकारची तंबाखूजन्य उत्पादने सेवन करणार नाही…..! मी स्वतःचं आरोग्य आणि माझ्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सजग राहीन…!
मी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा वसा घेऊन आणि इतर नाही यासाठी प्रेरित करीन….! मी शाळा, कॉलेज, कार्यस्थळ, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी गुटखा व तंबाखू विरोधी जनजागृती करीन..! मी माझा कृतीतून व्यसनमुक्त भारत या ध्येयासाठी सतत कार्यरत राहीन…! ही शपथ मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा, आणि जबाबदारीने घेत आहे…!” अशा प्रकारची शपथ रोटरी चे माजी उपप्रांतपाल किरण इंगळे यांनी दिली.
सदर जनजागृती अभियान घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. या मोहिमेचे आयोजन आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, दत्ता दळवी, राजेश आहेर, गणेश चोंधे, सुरज पवार मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, गजानन कांबळे, सुरेश शिंदे, सेवक कुणाल जाधव, परेश कुचेकर, प्रविण कांबळे, दत्ता जाधव यांनी परिश्रम केले. तसेच कमिन्सचे संदीप क्षिरसागर, संपत खैरे, वन नेटवर्क इंडियाचे सी. इ. ओ. समीर कुलकर्णी, बाळा साहेब दांडेकर सोहम खिलारे, जनवाणीचे समिर अजगेकर, सेवा संयोगचे युवराज चाबुकस्वार, मंदार जाधव, हेमंत झाडे सहभागी झाले.