‘भेटी लागी जीवा, लागिलीसे आस’…संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर

0

आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आषाढात पंढरपूरला जातात. टाळ- मृदुंग,भगवी पताका आणि मुखी विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा विठूरायांच्या दर्शनासाठी जातो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनाला निघतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १८ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहूतून होणार आहे. तर आळंदीतून १९ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. दोन्ही संस्थानाकडून पालख्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रवास

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी आळंदी येथील दर्शन मंडप इमारतीत पहिला मुक्काम करेल. २० जून रोजी पालखी पुण्यातील भवानीपेठ येथे पोहोचेल. तर २१ जून रोजी पुण्यातच मुक्कामी असेल. २२ जून रोजी पुण्याहून सासवडला प्रवास करताना शिंदे छत्री येथे आरतीसाठी विसावा आणि हडपसर येथे दुपारची विश्रांती होईल. २३ जून रोजी सासवड येथे मुक्काम असेल. २४ जून जेजुरी, २५ जून वाल्हे, २६ जून रोजी लोणंद, २७ जून तरडगाव, २८ जून फलटण आणि २९ जून बरड येथे पालखी थांबेल. ३० जून नातेपुते, १ जुलै माळशिरस, २ जुलै वेळापूर, 3 जुलै भंडीशेगाव आणि 4 जुलै वाखरी येथे मुक्काम होईल.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवास

संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्तान करेल. आकुर्डी येथे पहिला मुक्काम असेल. २० तारखेला आकुर्डीमधून निघेल अन् नानापेठ पुणे येथे मुक्कामी असेल. २१ जून रोजी तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात दिवसभरेल. २२ तारखेला लोणीकारभोर, २३ तारखेला यवत, २४ तारखेला वरवंड, २५ तारखेला उडंबडी गवळ्याची, २६ तारखेला बारमती,२७ जून सणसर, २८ जून निमगाव केतकी, २९ जून इंदापूर,३० जून सराटी,१ जुलै अकलूज, २ जुलै बोरगाव श्रीपूर, ३ जुलै पिराची कुरोली, ४ जुलै वखारी (पंढरपूर) येथे मुक्काम असेल.

अधिक वाचा  डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा मोबाईलपेक्षाही एक महत्वाची गोष्ट पोलिसांच्या हाती; मोठे खुलासे होण्याची शक्यता