राज्य सरकारच्या नगर विकास विभागाचा नवा आदेश; कुत्रा, मांजरा वरही स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

0

पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांवरही यापुढे अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. याबाबत नगर विकास विभागाकडून आदेश जारी करण्यात आलाय. तसंच प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुठेही फेकून दिले जातात. त्यामुळे दुर्गंधी सुटते आणि रोगराई पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून आदेश जारी करण्यात आला आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांबाबत आणि अंत्यसंस्काराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पाळीव प्राण्याचे मृतदेह खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याची डबकी, रस्त्यावर फेकले जातात. त्यामुळे अनेकदा परिसरात दुर्गंधी पसरते. रोगराईचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा  मारणे टोळी सूत्रधार रुपेश मारणेच्या मुसक्या आवळल्या; भाजप कार्यकर्त्याला मारहाण ९ महिने होता फरार

मृत्यू झालेल्या पाळीव प्राण्यांचे अंत्यविधी करताना दुर्गंधी येणार नाही. रोगराई पसरणार नाही याची काळजी घ्यावी. पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह इतरत्र टाकले जाणार नाहीत याबाबत दक्षता नागरी स्वराज्य संस्थांनी घ्यावी. पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कारासाठी ठराविक शुल्क आकारून अंत्यविधीची परवानगी द्यावी असंही राज्य सरकारने आदेशात म्हटलं आहे.