श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेच्या सन 20-25 ते 20 -30 या पंचवार्षिक संचालकपदाच्या निवडणूकीच्या प्रचार दौऱ्यात आज नांदेड गावातील ग्रामदैवत वडजाई मातेच्या मंदिरात प्रचार बैठक घेण्यात आली. 32 वर्षांपूर्वी 27000 रुपये भाग भांडवलावरून सुरू झालेली संस्था आज जवळपास 65 कोटी पर्यंत पोहोचविण्यात श्री रामेश्वर पॅनलच्या सर्व ज्येष्ठ संचालक, आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांचा मोठा वाटा असल्याचे अनेक मान्यवरांनी बोलून दाखवले. रामेश्वर पतसंस्था ही स्थापनेपासून विद्यमान संचालकांचे चेहरे पाहून इतकी मोठी झाली असून सर्व भाग भांडवलदारांच्या विश्वासावर श्री रामेश्वर पॅनलच्या सर्व संचालकांनी निर्धास्त राहण्याचे आश्वासन नांदेड ग्रामस्थांनी दिले.






नांदेड हद्दीतील पतसंस्था ही आमच्या घरची पतसंस्था असुन सर्व सभासद हे सधन असून समाजातील अनेक मान्यवर संस्थांवर काम करीत असल्याने येणारे काळात ही पतसंस्था 100 कोटींचा टप्पा गाठेल अशी आशा व्यक्त करीत श्री रामेश्वर पॅनलचे सर्व संचालक हे पतसंस्था सांभाळण्यास सक्षम असून ते सचालक समाजसेवा करण्यासाठी या संस्थेत असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आणि सर्व नांदेड ग्रामस्थांनी आपला जाहीर पाठिंबा श्री रामेश्वर पॅनलला देऊन सर्व उमेदवारांना विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प ग्रामदैवत वडजाई मातेच्या साक्षीने घेतला. 10000 पासून ते 50 लाख रुपयांची कर्ज रामेश्वर पतसंस्था देण्यास कशी मदत करते, विनासायास कर्ज वितरण कसे होते, सर्व संचालकांचे सौदार्यपूर्ण वागणूक आदी अनेक विषयावर कर्जदारांनी बँकेच्या संचालकांवर स्तुतीसुमने उधळली.
प्रचाराच्या या बैठकीस नांदेड गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, विविध पक्षाचे, सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कपबशी या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांच्या वतीने करण्यात आले.











