राजगड कादवे गाव तळमाळावर पाणावठा निर्मिर्ती: वन्यजीवांची तहान भागणार स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा उपक्रम

0

इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देवून नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने आपले वेगळेपण जपले आहे. ऐतिहासिक वास्तू,पाणी संवर्धन,वीरगळ संवर्धन, पर्यावरण संवर्धन ,विहिरीचे पुनरजजिविकरण,  प्राचीन अवशेष असलेल्या जागेची साफ करून आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. नुकतेच प्रतिष्ठान मधील तरुणाने राजगड तालुक्यातील कादवे गावाच्या तळमाळावर पक्षी प्राण्यांसाठी मानवनिर्मित पानवठयाची सोय करण्यात आली. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वनातील नैसर्गिक जलस्त्रोत लवकर आटल्याने डोंगरादार्‍यातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे वन्यजीव पाण्याच्या शोधात वाड्या वस्तीलगतच्या असलेल्या शेतात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

उष्णता एवढी वाढली आहे की झाडावर बसलेले पक्षी बेशुद्ध पडू लागलेत. माणसाने भर गर्मीत जर थंड पाणी पिले किंवा थंड पाण्याने हातपाय धुतले तर शरीरातील छोट्या छोट्या रक्ताच्या शिरा फाटन्यासारख्या घटना घडू लागल्यात. अशा उष्णतेत पशू पक्षी आपला घसा ओला करण्यासाठी धडपडताना दिसताहेत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनपरीक्षेत्र राजगड (उप वनविभाग भोर ) हद्दीत कादवे गावाच्या जंगलात जागोजागी करण्यात आली आहे व मुक्या जीवांची तृष्णा भागवली जात आहे तेच क्षण. मित्रांनो एक मनुष्य धर्म म्हणून आपणही आपल्या शेतात किंवा अंगणात पशूपक्षांना पाणी ठेवायला विसरू नका.ह्यासाठी पर्यावरण संवर्धनातुन पाणवठा निर्मिती मोहीम राबविण्यात आली होती.यामध्ये प्रतिष्ठान चे 7 सदस्यांनी सहभाग घेतला होता.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

प्रतिष्ठान चे राजगड तालुका प्रमुख अक्षय जागडे म्हणाले, गेले अनेक वर्षांपासून हे काम करत आहोत . पाण्याच्या शोधात प्राणी गावाकडे येत आहे त्यामुळे शिकारीचे प्रमाण वाढत आहे.ह्यासाठी उपाय म्हणुन रानातच असे पाणवठे तयार करून त्यांची तहान भागवली जाते.गावापासून दूर जंगलात 25 ते 30 लिटर पाणी डोक्यावर घेउन जाऊन असे पाणवठे तयार केले आहेत.वन्यजीव वाचवा पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश सदैव देत राहणार. पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी सहकार्य करून आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी माहितीचा हात पुढे करावा असे आव्हान अक्षय जागडे यांनी केले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या मोहिमेत आर्यन जागडे, ओम जागडे, साहिल केमुस्कर, साहिल जागडे, संस्कार शिंदे, विनोद मराठे उपस्थित होते. या मोहिमेचे नियोजन अक्षय जागडे यांनी केले.