‘फुले’ हिंदी चित्रपट ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया

0
2

महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित येऊ घातलेल्या ‘फुले’ या हिंदी चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील काही दृश्ये वगळावीत, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली होती. यानंतर सेन्सॉर बोर्डानेही यातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर राजकीय नेतेमंडळी, सामाजिक क्षेत्रातून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. महात्मा फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी घाई करून चित्रपटाबद्दल चुकीचा अर्थ काढला, असे अनंत महादेवन म्हणाले.

अनंत महादेवन यांनी नुकतंच एक पत्रक काढलं आहे. या पत्रकाद्वारे अनंत महादेवन यांनी चित्रपटाबद्दल लोक चुकीचा अर्थ काढत आहेत. “अनेक लोक ट्रेलर पाहून चित्रपट समाजाविरुद्ध आहे, योग्य प्रतिनिधित्व करत नाही असे अनुमान काढत आहे. पण त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहावा. मग तुम्हाला यात दाखवण्यात आलेल्या सर्व बाजू समजतील”, असे अनंत महादेवन म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

केवळ ट्रेलरवर अवलंबून न राहता संपूर्ण चित्रपट पाहावा. चित्रपट पाहिल्यावर लोकांना समजेल की यात सर्व बाजू संतुलितपणे दाखवण्यात आल्या आहेत. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाकडे पाहिले, त्याच दृष्टिकोनातून या चित्रपटाकडे पाहावे. हा चित्रपट दलित आणि अन्याय सहन करणाऱ्या वर्गाला वर आणण्यासाठी बनवला आहे. कोणत्याही उच्च वर्गाला खाली दाखवण्यासाठी नाही, असेही अनंत महादेवन यांनी म्हटले.

सेन्सॉर बोर्डाने काय बदल सुचवले?

फुले दाम्पत्याने केलेल्या रक्तरंजित क्रांतीचा उद्देश एकसंध भारत आणि वर्गांमध्ये समानता आणणे हा होता. जेणेकरून आपण ब्रिटिशांविरुद्ध लढू शकू. सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवताना अधिक संवेदनशीलता दाखवली, ज्याची गरज नव्हती. बोर्डाने चित्रपटात इतिहासाचे योग्य चित्रण असल्याचे मान्य केले होते. त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाचे नाव न घेता ‘मागासलेले वर्ग’ असा उल्लेख करण्यास सांगितले. तसेच, एका संवादात ‘3000 वर्षांपूर्वी’ हे वाक्य बदलून ‘अनेक वर्षांपूर्वी’ करण्यास सांगितले. हे बदल फार महत्त्वाचे नव्हते आणि जरी ते तसेच ठेवले असते तरी कोणालाही आक्षेप आला नसता, असेही महादेवन यांनी नमूद केले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

जर कोणी या चित्रपटाचा वापर राजकीय साधन म्हणून करू इच्छित असेल, तर ते त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही. मात्र, सर्व राजकीय पक्षांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे, ही चांगली गोष्ट आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना संपर्क साधून चित्रपटासाठी समर्थन दर्शवले आहे, असेही अनंत महादेवन म्हणाले.

विशेष स्क्रीनिंगचे आयोजन नाही

इतर चित्रपट आधुनिक समाजाचे दिग्दर्शकांचे मत दर्शवतात आणि त्यात काल्पनिक गोष्टींचा वापर केला जातो. ‘फुले’ मात्र इतिहासाचे प्रामाणिक चित्रण आहे. यात कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही. त्यामुळे यात काहीही वाढवून सांगितले आहे किंवा हेतुपुरस्सरपणे काही अजेंडा चालवला आहे, असे म्हणण्याची गरज नाही, असे महादेवन यांनी स्पष्ट केले. जर काही चूक केली असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तरच त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याची गरज आहे. अन्यथा, कोणासाठीही विशेष स्क्रीनिंग आयोजित केली जाणार नाही, असेही महादेवन यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर