दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं…; मालवणी पोलिसांचा दावा

0
16

सेलिब्रेटी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानं मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं १४ मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवल्याचा दावा मुंबईतील मालवणी पोलिसांनी केला आहे. त्यामुळं आता यातील आरोप-प्रत्यारोप आणि तपास अधिकाऱ्यांचे दावे यामुळं या प्रकरणाचं पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे.

मालवणी पोलिसांचा दावा काय?

दिशा सालियान प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तिनं आत्महत्या केल्याच नमूद करण्यात आलं होतं. यामध्ये तिनं कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये त्यांना पैसे देऊन ती वैतागली होती.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

याबाबत तिनं आपल्या मित्रांकडं देखील भाष्य केलं होतं. यामुळं प्रचंड तणावात आणि डिप्रेशनमध्ये असल्यानं दिशा सालियानं हिनं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं, असं विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

राणेंना सहआरोपी करा – अंधारे

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “एखाद्याच्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्यात काही बरं-वाईट झालेलं असेल तर याबाबत न्याय मागण्याचा हक्क कुटुंबियांना नक्कीच आहे. पण एकीकडं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल होतो, इतरही अनेक कारण समोर येत आहेत. यामध्ये आता आर्थिक ताणतणावातून डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं टोकाचं पाऊल उचललेलं असू शकतं, असंही म्हटलं आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

पण यामध्ये राजकीय भांडवल केलं जातं हे निश्चित वाईट आहे. याप्रकरणातील तपासातून आणखी सत्य बाहेर येईल. आदित्य ठाकरेंचा यामध्ये काय संबंध आहे? उगाच राजकारणासाठी संबंध जोडणं आणि एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं राणेंनी आता थांबवावं. अन्यथा पुरावे असूनही दडवत असल्याप्रकरणी राणेंना यामध्ये सहआरोपी करावं, अशी मागणी यावेळी सुषमा अंधारे यांनी केली.