लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात सापडला तरूणीचा मृतदेह, पोलीस चौकशीत समोर आली खळबळजनक घटना

0

पुण्यातून एक खळबलजनक माहिती समोर आली आहे. 18 मार्च 2025 पासून बेपत्ता असलेल्या एका तरूणीचा काल थेट मृतदेहच सापडला. सांगवीमधील रहिवासी मानसी प्रशांत गोविंदपूरकर (21) हिचा मृतदेह बुधवारी सकाळी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला. नवग्रह मंदिराजवळ असलेल्या झाडीमध्ये हा मृतदेह पडलेला होता.

मानसी लोहगड किल्ल्यावर एकटीच गेली होती. तिथे पोहोचण्यासाठी तिने खाजगी टॅक्सी बुक केली होती. सकाळी 8:56 वाजता तिकीट कार्यालयाजवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती कैद झाली होती. मात्र, ती परत येतानाची कोणतीही नोंद नव्हती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास सुरू केला आणि टॅक्सी चालकाचा शोध घेतला. टॅक्सी चालकाने मुलीला किल्ल्यावर सोडल्याची माहिती दिली. तसंच ती एकटी होती असही सांगितलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

काल सकाळपासूनच मुलीचे नातेवाईक आणि पोलिस पथकं किल्ल्याभोवती शोध मोहीम राबवत होते. शिवदुर्ग बचाव पथकाचा फोन आल्यानंतर नवग्रह मंदिराजवळील झुडुपात मुलीचा मृतदेह आढळला. बचाव पथकानं मृतदेह बाहेर काढला, स्ट्रेचरमध्ये पॅक केला आणि तिच्या कुटुंबियांना आणि पोलिसांच्या ताब्यात दिला.

मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात होता की घातपात की तिने आत्महत्या केली, हे शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, मानसी तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच तीचं अपेन्डीक्सचं ऑपरेशन झालं होतं. तसंच काही आजारपणांमुळे तिला एल.एल.बी मधील तिसऱ्या वर्षाची परीक्षाही देता आली नाही. यावरुच तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती