धनंजय मुंडेंचं बहीण पंकजाला आणखी एक गिफ्ट; अर्धातास बंद दाराआड चर्चा

0

बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड ही बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गटाचे चंद्रकात कराड यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे 11 संचालक तर धनंजय मुंडे यांच्या गटाचे 10 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. कारखान्याच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र आल्याची कबुली बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

खडसेंची भेट

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जवळपास अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली होती. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या.