शिवाजी महाराज जयंती नाचून नव्हे वाचुन साजरी करा! मोरया मित्र मंडळाचा ५वा उपक्रम; शिवचरित्रकार प्रसाद मोरेंचे व्याख्यानही

0
4

छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन मोरया मित्र मंडळाचा वेगळा स्तुत्य उपक्रम शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध युवा शिवशंभूव्याख्याते प्रसादजी मोरे यांनी उद्गार काढले मोरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते.

मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने कर्वेनगर ते डेक्कन भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन राष्ट्रवीर छत्रपती संभाजी आणि साधू पुत्र शंभू हे शंभू चरित्र भेट देण्यात आले. तसेच पुणे मनपा साह्यक आयुक्त दिपक राऊत, विजय नायकल , पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरीष्ठ पोलिस निरीक्षक वारजे पोलिस स्टेशन विश्वजीत काइंगडे तसेच इत्यादीना शंभू चरित्र भेट देण्यात आले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते , गेल्या ५ वर्षा पासून शिवाजी महाराज जयंती नाचून नाही वाचुन साजरी करावी हि संकल्पना पुढे आली कारण

शिवाजी म्हणजे
शि –  शिका
वा – वाचा
जी – जिंका

म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही हि पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत.आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे.म्हनुन त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे भविष्यात विद्यार्थी शिवचरित्राचं वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाही असं वाटतं तसेच या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट आल्यामुळे संभाजी महाराजमय वातावरण निर्माण झाले आहे या गोष्टीचा फायदा घेऊन संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट दिली आहे. कारण पुढील पिढीला छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा इतिहास अधिक माहिती व्हायला हवा असे मत मांडले.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

हे शिवचरित्र भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य  इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे व केदार मारणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सा मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, पौर्णिमा केसवड,अनिल आठवले, देवेंद्र दांडेकर, सागर जगताप, गिरीश भागवत,मयुर बनकर , विनायक उभे मुख्याध्यापक किरण कोल्हे,शिक्षक कैलास सरतापे, नीला कुलकर्णी आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांना हा उपक्रम खूप आवडला ते म्हणाले मोरया मित्र मंडळाचा खूप छान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असेच उपक्रम भविष्यात सर्व मंडळांनी राबविले पाहिजेत .