बदललेल्या सत्ताकरणांच्या गणितात श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे निवडणुकीचे बिगूल; आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू

0

मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि बदललेल्या सत्ताकरणांच्या गणितामुळे चुरशीची होणाऱ्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आज सोमवारपासून (दि.3) सुरू होत आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज सोमवारपासून (दि.3) सुरू होणार महिनाभराच्या प्रचारानंतर दिनांक 5 एप्रिलला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने कायमच या कारखान्यावरती विद्यमान अध्यक्ष माजी खासदार नाना नवले यांचे असलेले वर्चस्व आणि नव्या राजकीय समीकरणामुळे इच्छुकांच्या मनीषाला मिळालेले बळ यामुळे कासारसाईच्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील सर्वच भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवीन नेतृत्व उदयास आले असून गट नंबर ५ खेड-हवेली- शिरूर या मतदारसंघातून पूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेले माऊली कटके तर गट नंबर 2 पौड-पिरंगुट मध्येही भोर वेल्हा मुळशी मतदारसंघातून मोठ्या घराण्याचा पराभव करून शंकर मांडेकर यांनी तालुक्यातील पकड सिद्ध केली असून या वाढत्या जनाधाराचा आधार घेत संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सार्वत्रिक निवडणूक रंजक वळणावरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मावळ मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या सुनील शेळके यांची ही मनीषा श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालावा अशी असल्याने गट नंबर 3 तळेगाव-वडगाव व गट नंबर 4 सोमाटणे-पवनानगर  या दोन्ही गटांमध्ये तब्बल सहा आणि लक्षणीय संचालक नियुक्त करण्यात येणार असल्याने गट नंबर तीन आणि चार या दोन गटाकडे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची वाटचाल आणि कारभार कोणाच्या हाती राहणार यावरती भवितव्य अवलंबून राहणार आहे. विद्यमान संचालकामध्ये बापू भेगडे यांच्यावतीने या दोन गटांवरती वर्चस्व मिळवण्यासाठी कायमच प्रयत्न सुरू असताना सर्वाधिक मताधिक्याने विजय झालेले सुनील शेळके आणि बापू भेगडे या निमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान संचालक माजी खासदार विदुरा उर्फ नाना नवले यांच्या विषयी सर्व सभासदांमध्ये आप्तेष्ट पणाची भूमिका असली तरी सुद्धा संचालक मंडळाच्या कार्यभारावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मावळ, मुळशी, हवेली, खेड व शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात एकूण 22 हजार 258 मतदारसंख्या असून 21 संचालक कार्यरत आहेत. संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 3 ते 7 मार्चपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत समिती सभागृह, पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती होणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया त्याच ठिकाणी १० मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कामकाज संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी २५ मार्चपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर २६ मार्च रोजी अंतिम विधीग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्ह) वाटपाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.

}{ श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम }{

10 मार्चला नामनिर्देशन पत्र छाननी

प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कामकाज संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

25 मार्च नामनिर्देशन पत्र मागे

तसेच, नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दिनांक 25 मार्चपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

26 मार्च अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी व निशाणी निवडणूक चिन्ह वाटप

दिनांक 26 मार्च रोजी अंतिम विधीग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारांना निशाणी (निवडणूक चिन्ह) वाटपाची कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.

5 एप्रिलला मतदान

दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानप्रक्रिया घेण्यात येणार असून,

6 एप्रिल मतमोजणी

मतमोजणी दिनांक 6 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी दिली.

मतदारसंघ व प्रतिनिधी संख्या :

1. व्यक्ती उत्पादक सभासद

  • गट नंबर 1 हिंजवडी-ताथवडे – संचालक संख्या 3
  • गट नंबर 2 पौड-पिरंगुट  – संचालक संख्या 3
  • गट नंबर 3 तळेगाव-वडगाव  – संचालक संख्या 3
  • गट नंबर 4 सोमाटणे-पवनानगर  – संचालक संख्या 3
  • गट नंबर ५ खेड-हवेली-शिरूर  – संचालक संख्या 4

2. अनुसूचित जाती/जमाती  – संचालक संख्या  1

3. महिला राखीव प्रतिनिधी  – संचालक संख्या 2

4. इतर मागासवगीय प्रतिनिधी  – संचालक संख्या 1

5. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी  – संचालक संख्या 1