तो कॉल प्रशांत कोरटकरनेच…. इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या कोरटकरचे CM फडणवीसांसह या नेत्यांशी संबंध

0

इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा आरोप असणाऱ्या प्रशांत कोरटकर सध्या पोलिसाना सापडत नाही. कोरटकरला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपुरात तळ ठोकून आहेत. तपासानंतर तो कॉल प्रशांत कोरटकरनेच केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती आहे. त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर घरातून गायब झाला असल्याची माहिती आहे. सध्या त्याच्या मित्रासोबत कोरटकर इंदोरला पळून गेल्याचं कळतं आहे.

प्रशांत कोरटकरबाबत नवी माहिती समोर…

दरम्यान, आता या प्रशांत कोरटकरबाबतच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. विशेष म्हणजे त्याची लाईफस्टाईफ. त्याचे महागड्या गाड्यांमध्ये फिरतानाचे व्हिडीओ आणि देवेंद्र फडणवीसांसह अनेक दिग्गज नेत्यांसोबतचे हसत खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ…..

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

काही फोटो जे समोर आले आहेत त्यावरुन कोरटकरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी अत्यंत जवळचे संबंध असल्यासारखे दिसून येत आहे. यावरुन सोशल मीडियात काही नेटीजन्स फडणवीसांना देखील घेरत आहेत. ‘इंद्रजित सावंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तरी चौकशीत काहीच साध्य होणार नाही. पोलिसच काय.. महाराष्ट्र प्रशासन देखील प्रशांत कोरटकरांच्या पाठीशी आहे.’ असं एका यूझरने म्हटलं आहे.

याशिवाय कोरटकरचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील फोटो आणि सेल्फी व्हिडीओज आहेत. शिवाय भाजप-महायुतीच्या अन्य काही नेत्यांसोबतही त्याचे फोटो दिसून आले आहेत. याशिवाय बड्या-बड्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो देखील दिसून येत असल्याने त्याच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

त्याचे महागड्या गाड्यांमध्ये फिरतानाचे काही व्हिडीओज देखील आम्हाला सोशल मीडियात मिळाले. एकूणच प्रशांत कोरटकरवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तो पोलिसांना मिळत नाहीए. त्याची ही लाईफस्टाईल आणि नेत्यांसोबतचे सख्य पाहता त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.