पुणे : पुण्यात जीबीएस म्हणजेच (Guillain barre Syndrome) गुईलेन बॅरे सिंड्रोमने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दिनांक ११ फेब्रुवारीला रुग्णांची संख्याही १९७ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा हा ७ वर पोहोचला आहे.






पुण्यात जानेवारी महिन्यात जीबीएसचा शिरकाव झाला. त्यानंतर दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पहिल्या रुग्णांचा मृत्यू हा पुण्यातच झाला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत पुण्यातील जीबीएस रूग्णसंख्या 197 वर पोहोचली आहे. आजही 2 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत जीबीएस रोगाच्या साथीनं 7 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 3 मृत्यू हे संशयित कॅटेगरीत दाखवले आहे. या साथीदरम्यान 104 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 50 रूग्ण आयसीयूत तर 20 रूग्ण अजूनही व्हेंटिलेटर आहेत.
सोलापूरमध्येही जीबीएसचा शिरकाव
दरम्यान, पुण्याआधी सोलापूरमध्ये जीबीएसचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. कारण गेल्या मे महिन्यापासून सोलापूरचा 10 वर्षीय जीबीएस बाधीत मुलगा केईएमध्ये उपचार घेतोय.त्यामुळे पुण्याआधी सोलापूरमध्ये जीबीएसचा शिरकाव झाल्याची माहिती आहे.
केईएम रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यापासून रुग्णालयात दोन लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. ही दोनही मुले सोलापूरची आहे. यातील दहा वर्षाच्या मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की, दहा वर्षाच्या मुलाला पाय दुखण्यापासून सुरूवात झाली. त्याला ताप किंवा इतर कोणतीही तक्रार नव्हती.
या मुलाची आई सांगते, आमच्या घरापासून शाळा 3 किलोमीटर अंतरावर आहे.चालल्याने पाय दुखत असतील म्हणून सूरूवातीला आम्ही दुर्लक्ष केले.पण महिनाभर पाय दुखत असल्याची तक्रार कायम असल्याची तक्रार कायम राहिल्याने आम्ही डॉक्टरांकडे गेलो. चाचण्यांमध्ये कमी प्लेटलेट्स आढळले. त्यानंतर तो इतका आजारी पडला की त्याला उठताही येत नव्हते. त्याच्या एमआयआर चाचणीत जीबीएसचे निदान झाले.











