‘हा’ बडा नेता उद्या शिवसेनेत प्रवेश करणार? रत्नागिरीच्या माजी आमदारापासून शिवसेनेच्या प्रवेशाची सुरुवात, उदय सामंतांचा दावा

0

राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचा मुहूर्तही त्यांनी सांगितला. शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार असून त्याची सुरुवात रत्नागिरीतील माजी आमदारांपासून होईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. त्यामुळे राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे.

रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांच्यासोबत अजून चार आमदारही सेनेत येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोबतच काँग्रेसचे पाच आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदारही शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

प्रवेशाची सुरुवात माजी आमदारांपासून

शिवसेनेत अनेकजण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी रत्नागिरीमधून होत आहे. रत्नागिरीतील माजी आमदार उद्या प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातले 10 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यातील काहीजण हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. या दोन ते तीन महिन्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे अनेक नेते एकनाथ शिंदेचं नेत्रुत्व स्वीकारतील. याची सुरुवात ही माजी आमदारांपासून होणार आहे.

उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यानुसार, राजन साळवी हे शुक्रवारी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाराज राजन साळवी शिंदे गटात जाणार?

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

राजन साळवी रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार असून ते ठाकरेंना रामराम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. निवडणुकीतल्या पराभवानंर अस्वस्थ झालेल्या साळवींनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात राजन साळवींनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचीही माहिती आहे.

उद्धव ठाकरेंना टोला

काही लोकांच्या फडणवीसांकडे वाऱ्या सुरु झाल्या ते आपण पाहिलं. तू राहशील किंवा मी राहीन असं म्हणणारे आज फडणवीसांच्या जवळ जात आहेत. त्यांना देखील समजलं आहे की महायुती शिवाय पर्याय नाही असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा