महायुती माजी मंत्र्यांचे ‘प्रगती पुस्तक’ व्हायरल; भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी सहा चेहरे धोक्यात? धक्कादायक नावे यांचा पत्ता कट होणार?

0
2

महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा लवकरच शपथविधी होणार आहे. या शपथविधी आधीच महायुतीच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठोपाठ महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झालं आहे. महायुतीचे मंत्रिमंडळ स्वच्छ आणि निष्कलंक असावे, अशी दिल्लीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाची आग्रही भूमिका आहे. यामुळे काही माजी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसणाऱ्या त्रयस्थ संस्थेकडून महायुतीच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील नव्या राज्य मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेचे आणि स्वच्छ चारित्र्याच्या आमदारांना स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाची ठाम भूमिका आहे. भ्रष्टाचारी माजी मंत्र्यांपेक्षा नव्या दमाच्या तरुण आमदारांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या स्पष्ट सूचना आहेत. येत्या काही दिवसांत नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, हे पाहावे लागेल.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

महायुतीच्या आधीच्या मंत्रिमंडळातील कोण आहेत डागाळलेले माजी मंत्री प्रगती पुस्तकात नापास ठरलेले माजी मंत्री कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेस- छगन भुजबळ, हसन मुश्रीफ

भाजप- सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे

 शिवसेना- संजय राठोड, अब्दुल सत्तार

नव्या मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १३ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना शपध देणार आहे. काल झालेल्या बैठकीत १३ तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत तारखेबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. तसेच या बैठकीत मंत्रिमंडळात किती आणि कोण असणार यावर देखील चर्चा आणि निर्णय होणार आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली