EVM विरोधात राहुल गांधींचा लाँग मार्च, महाराष्ट्रातील ‘या’ गावातून करणार सुरुवात

0

राज्यातील सत्तास्थापनेचा घोडेबाजार अखेर संपला आहे. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंरबला जाहीर झाले. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. यावरुन आता विरोधक राज्यभरात ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवताना दिसत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यांनी EVM ची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला. या घटनेनं राज्यसह देशभरात मारकडवाडी चर्चेचा विषय ठरले होते. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली होती. यानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवरील मतदान करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं. प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

सोलापुरात ईव्हीएम विरोधात संताप

यानतंर आता सोलापुरातील मारकडवाडीतून एक मोठा लाँग मार्च काढला जाणार आहे. हा लाँग मार्च ईव्हीएम विरोधात असणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीकडून EVM मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते.

ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न
या आंदोलनावेळी महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारडवाडीतून लॉन्ग मार्च काढणार आहेत. मारकडवाडी या ठिकाणी ईव्हीएमविरोधात पडलेली ठिणगी देशभर वनवा पेटवेल, असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

वंचितकडूनही जनआंदोलनाची हाक
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार येत्या 3 ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.