सलग पाचव्यांदा आमदार झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकनिष्ठ शिलेदाराला उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी?

0

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर आता उपमुख्यमंत्रिपदासाठी दादा भुसे यांचं नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दादा भुसे हे यावेळी सलग पाचव्यांदा आमदार झाले आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.

सगळ पाचव्यांदा आमदार झालेल्या दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे हे जर मुख्यमंत्री झाले नाही, तर ते उपमुख्यमंत्री देखील होणार नाहीत असं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या दादा भुसे यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना आपला राजीनामा दिला, त्यावेळी देखील दादा भुसे त्यांच्या सोबत होते. त्यामुळे त्यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा मिळणार आहे का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!